Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 14:15 IST2025-06-12T14:13:52+5:302025-06-12T14:15:16+5:30

Air India Plane Crash in Ahmedabad: गुजरातमधील अहमदाबादमध्ये २४२ प्रवाशांसह एअर इंडियाचे विमान कोसळले, अशी माहिती राज्य पोलिस नियंत्रण कक्षाने दिली आहे.

Plane crashes in Ahmedabad Gujarat several passengers suspected to be on board smoke visible far away | Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती

Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती

Ahmedabad Plane Crash: गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठा विमानअपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अहमदाबाद येथे विमान कोसळून हा अपघात झाला आहे. अहमदाबादमधून या विमान अपघाताचे भयावह फोटो आणि व्हिडीओही समोर येत आहेत. विमान अपघातानंतर अहमदाबादच्या मेघानी परिसरात आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसत आहे. तसेच दूरवरून काळ्या धुराचे ढग दिसत आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार हे एक प्रवासी विमान होते.

गुजरातमधील अहमदाबादमध्ये २४२ प्रवाशांसह एअर इंडियाचे विमान कोसळले, अशी माहिती राज्य पोलिस नियंत्रण कक्षाने दिली आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार, विमानाला उड्डाणादरम्यान अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा दुर्दैवी अपघात झाला. लंडनला जाणारे हे प्रवासी विमान विमानतळाजवळच कोसळले. समोर आलेल्या फोटोंमधून विमानाचे तुकडे झाले असल्याचे दिसून येते. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

विमान दुर्घटनेचे महत्त्वाचे अपडेट्स

- एअर इंडियाचं बोईंग ड्रीमलाइनर ७८७ विमान
- दुपारी १ वाजून ३८ मिनिटांनी उड्डाण
- उड्डाणानंतर काहीच मिनिटांत रहिवासी भागावर कोसळलं विमान
- विमानाच्या इंधन टाक्या पूर्णपणे भरलेल्या असल्याने जास्त नुकसान
- दुर्घटना परिसरातील अनेक वाहनं जळून खाक
- विमान दुर्घटनेमुळे परिसरातील इमारतीही कोसळल्या
- अहमदाबाद अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

विमान कोसळतानाचे दृष्य कॅमेरात कैद

सीआयएसएफच्या म्हणण्यानुसार, उड्डाण घेतल्यानंतर, विमान शहरातील एका निवासी भागातील एका इमारतीवर आदळले आणि त्यानंतर त्यात मोठी आग लागली. अपघातानंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरु करण्यात आहे. या हृदयद्रावक घटनेत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

Web Title: Plane crashes in Ahmedabad Gujarat several passengers suspected to be on board smoke visible far away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.