बोहल्यावर चढणार Physics Wallah, कोचिंगद्वारे 8,000 कोटींची बनवली कंपनी; वाचा संघर्ष आणि यशाची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 05:49 PM2023-02-23T17:49:33+5:302023-02-23T17:50:30+5:30

PhysicsWallah CEO Alakh Pandey : अलख आणि शिवानी यांचा लग्नसोहळा दिल्लीतील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये पार पडणार आहे.

PhysicsWallah CEO Alakh Pandey and Shivani Dubey will soon get married, built a company worth crores in a few years | बोहल्यावर चढणार Physics Wallah, कोचिंगद्वारे 8,000 कोटींची बनवली कंपनी; वाचा संघर्ष आणि यशाची कहाणी

बोहल्यावर चढणार Physics Wallah, कोचिंगद्वारे 8,000 कोटींची बनवली कंपनी; वाचा संघर्ष आणि यशाची कहाणी

googlenewsNext

नवी दिल्ली : ऑनलाइन एज्युकेशन प्लॅटफॉर्म फिजिक्स वालाचे संस्थापक आणि सीईओ अलख पांडे सध्या आपल्या लग्नामुळे चर्चेत आहेत. या महिन्यात अलख पांडे लवकरच गर्लफ्रेंड शिवानी दुबे हिच्याशी लग्न करणार आहेत. या दोघांची एंगेजमेंट गेल्या वर्षी दिल्लीत झाली होती. तसेच, अलख आणि शिवानी यांचा लग्नसोहळा दिल्लीतील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये पार पडणार आहे. अलख पांडे आणि शिवानी दोघेही उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील आहेत. शिवानी या व्यवसायाने पत्रकार असून राजकीय आणि सांस्कृतिक विषयांवर त्या लिहितात. तसेच, अलख पांडे हे एडटेक युनिकॉर्न फिजिक्सवालाचे संस्थापक आहेत.

यशामागे कठोर संघर्ष!
अलख पांडे यांच्या यशामागे खडतर संघर्ष दडलेला आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांचे घरही विकले गेले. यानंतर आठवीत असतानाच त्यांनी मुलांना कोचिंग शिकवायला सुरुवात केली. कॉलेजमध्ये असताना त्यांनी कानपूरमधील एका खासगी कोचिंग सेंटरमध्ये शिकवण्यासाठी आपले शिक्षण सोडले.

हजारो विद्यार्थी आणि 8 हजार कोटींची उलाढाल
अलख पांडे यांच्या यशाचा प्रवास मुलांना कोचिंग सेंटरमध्ये शिकवण्यापासून सुरू झाला आणि त्यानंतर त्यांनी आपले यूट्यूब चॅनल सुरू केले. त्यांचे संपूर्ण लेक्चर ते या चॅनलवर अपलोड करत होते. काही दिवसांतच सोशल मीडियावर त्यांचे फॉलोअर्स वाढले. यानंतर त्यांनी जिक्सवालाचे नवीन कोचिंग सुरू केले, त्यात महिनाभरात 10 हजार मुलांनी प्रवेश घेतला. आज त्यांच्या एडटेक कंपनीची उलाढाल 8 हजार कोटी आहे.

2017 मध्ये युनिकॉर्नच्या लिस्टमध्ये सामील
दरम्यान, अलख पांडे यांची फर्म 2017 मध्ये युनिकॉर्नच्या लिस्टमध्ये सामील झाली. फिजिक्सवाला यूट्यूब चॅनलवर फिजिक्स, मॅथ्स, बायोलॉजी आणि इकोनॉमिक्स शिकवले जाते. 69 लाखांहून अधिक युजर्सनी Physicswallah YouTube चॅनलला सब्सक्राइब केले आहे. याचबरोबर, Android Play Store वर ते 50 लाखांहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अलख पांडे यांनी फिजिक्सवाला सुरू करण्यापूर्वी करोडो रुपयांचे जॉब पॅकेज नाकारले आहे. 

Web Title: PhysicsWallah CEO Alakh Pandey and Shivani Dubey will soon get married, built a company worth crores in a few years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.