कोरोनाविरोधात Pfizer करणार भारताची मदत; ७ कोटी डॉलर्सची औषधं पाठवण्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 02:02 PM2021-05-03T14:02:06+5:302021-05-03T14:06:52+5:30

Coronavirus : कोरोनाच्या लसीसाठी मंजुरी देण्यासाठीही सरकारशी चर्चा. गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद

Pfizer in talks with India over expedited approval for COVID 19 vaccine will send medicines | कोरोनाविरोधात Pfizer करणार भारताची मदत; ७ कोटी डॉलर्सची औषधं पाठवण्याची घोषणा

कोरोनाविरोधात Pfizer करणार भारताची मदत; ७ कोटी डॉलर्सची औषधं पाठवण्याची घोषणा

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाच्या लसीसाठी मंजुरी देण्यासाठीही सरकारशी चर्चा.गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाबाधितांची नोंद

गेल्या काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. काही दिवसांपासून सातत्यानं साडेतीन-चार लाखांच्या जवळपास रुग्णवाढ होत आहे. अशा परिस्थितीत  आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. दरम्यान, अनेक देशांकडून मोठ्या प्रमाणात मदतही करण्यात येत आहे. आता अमेरिकेच्या Pfizer या कंपनीनं भारतासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. फायझर भारतासाठी तब्बल ७ कोटी अमेरिकन डॉलर्सच्या औषधं भारतात पाठवणार आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा सामना करण्यास भारताला मदत मिळणार आहे. याशिवाय लसीसंदर्भातही कंपनी भारताशी चर्चा करत असल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसलेल्या भारताला संकटाचा सामना करण्यासाठी अमेरिकन फार्मा कंपनी Pfizer नं मदतीचा हात पुढे केला आहे.कंपनी भारताला ७ कोटी डॉलर्सची औषधं पाठवणरा आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलबर्ट बॉरला यांनी ही माहिती दिली. याशिवाय आपल्या लसीला भारतात लवकरात लवकर परवानगी देण्यासाठीही सरकारशी चर्चा सुरू असल्याची माहिती बॉरला यांनी लिंक्डीनवरून दिली. 

आमचा अर्ज महिन्याभरापूर्वीच सादर करण्यात आला आहे. परंतु लसीची भारतात नोंदणी झाली नाही, असंही त्यांनी नमूद केलं. आमची भारत सरकारबरोबर चर्चा सुरू आहे. तसंच याला मंजुरी मिळाल्यास देशात याच्या वापरास सुरूवात करता येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

देशात २४ तासांत ३,४१७ मृत्यू

देशात गेल्या चोवीस तासांत ३ लाख ६८ हजार १४७ नवे रुग्ण आढळले. तर दिसभरात कोरोनामुळे ३४१७ जणांचा मृत्यू झाला. तसेच ३ लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. जगातील इतर देशांपेक्षा भारतात दिवसेंदिवस सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद होत आहे.  देशातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ९९ लाख २५ हजार ६०४ झाली असून, त्यातील १ कोटी ६२ लाख ९३ हजार ००३ जण बरे झाले. या कोरोना संसर्गाने आतापर्यंत २ लाख १८ हजार ९५९ जणांचा बळी घेतला आहे. देशात कोरोनाच्या उपचाराधीन रुग्णांची संख्या ३४ लाख १३ हजार ६४२ इतकी आहे.  
 

Read in English

Web Title: Pfizer in talks with India over expedited approval for COVID 19 vaccine will send medicines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.