शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

परदेश प्रवासासाठीची याचिका  आनंद तेलतुंबडे यांच्याकडून मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 10:20 IST

मानवाधिकार कार्यकर्ते डॉ. आनंद तेलतुंबडे यांना शैक्षणिक कामानिमित्त ॲमस्टरडॅम आणि युनायटेड किंग्डममध्ये जाण्याची परवानगी देण्यास उच्च न्यायालयाने उदासीनता दाखविली.

मुंबई : मानवाधिकार कार्यकर्ते डॉ. आनंद तेलतुंबडे यांना शैक्षणिक कामानिमित्त ॲमस्टरडॅम आणि युनायटेड किंग्डममध्ये जाण्याची परवानगी देण्यास उच्च न्यायालयाने उदासीनता दाखविली. त्यामुळे तेलतुंबडे यांनी स्वत:हून ही याचिका मागे घेतली. ते एल्गार परिषद प्रकरणात आरोपी आहेत.न्या. अजय गडकरी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने तेलतुंबडे यांना परदेशात जाण्यास परवानगी देण्याबाबत अनिच्छा व्यक्त करत त्यांना व्हर्च्युअली लेक्चर देण्याची सूचना केली.  तेलतुंबडे यांच्या अर्जावर एनआयएने आक्षेप घेतल्यानंतर  न्यायालयाने तेलतुंबडे यांना म्हटले की, तुम्ही लेक्चर व्हर्च्युअली घ्या किंवा जाऊ नका. तेलतुंबडे केवळ लेक्चर देत नाहीत, तर वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये सेमिनारही आयोजित करतात. त्यामुळे त्यांना परदेशात प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती तेलतुंबडे यांचे वकील ॲड. मिहीर देसाई यांनी केली. तर एनआयएतर्फे ॲड. चिंतन शहा यांनी तेलतुंबडे फरार होण्याची शक्यता असल्यामुळे प्रवासाची परवानगी देऊ नका, अशी विनंती न्यायालयाला केली. 

न्यायालय काय म्हणाले?एनआयएच्या युक्तिवादावर सहमती दर्शवत न्यायालयाने म्हटले की, विशेष न्यायालयाने आरोपमुक्ततेचा अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे तेलतुंबडे फरार होऊ शकतात हे लक्षात घेता, प्रवासाची परवानगी देऊ शकत नाही. त्यानंतर ॲड. देसाई यांनी याचिका मागे घेण्याची मुभा न्यायालयाकडे मागितली आणि न्यायालयाने ती मान्य केली. तेलतुंबडे यांनी केलेल्या याचिकेनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर व्याख्याने देण्यासाठी नेदरलँड्स आणि युकेमध्ये आमंत्रित करण्यात आले होते.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र