शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

'देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत हीच जनतेची इच्छा होती, पण धोका झाला'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 9:46 PM

भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यामध्ये, सध्या देशातील परिस्थिती कोरोनावरील उपाय आणि केंद्र सरकारच्या वर्षाभरातील कार्याचा आढावा याबाबत आपलं मत व्यक्त केलं.

मुंबई - जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे केंद्र बनलेले चीनमधील वुहान शहर आता जवळपास कोरोनामुक्त झाल्याचे वृत्त आहे. चीनमध्ये कोरोनाच्या संसर्ग झालेल्या शेवटच्या तीन रुग्णांनीही कोरोनावर मात केली असून, आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या आकड्यांवर भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. चीनमध्ये कम्युनिष्टांचं सरकार असल्याने तेथील आकड्यांची गॅरंटी नसल्याचं नड्डा यांनी म्हटलं आहे. त्यासोबत, महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवरही जेपी नड्डा यांनी भाष्य केलंय. तसेच, महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी आमच्यासोबत धोका झाल्याचं नड्डा यांनी म्हटलंय. 

भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यामध्ये, सध्या देशातील परिस्थिती कोरोनावरील उपाय आणि केंद्र सरकारच्या वर्षाभरातील कार्याचा आढावा याबाबत आपलं मत व्यक्त केलं. आकडेवारीनुसार चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचा एकूण आकडा ८३ हजार ०२७ एवढा झाला असून, त्यापैकी ६६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर ७८ हजार ३२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. चीनमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे ४ हजार ६३४ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, चीनमधील रुग्णांची आकडेवारी नो गॅरंटी असल्याचं नड्डा यांनी म्हटलंय. याच मुलाखतीत नड्डा यांना प्रादेशिक पक्षांकडून भाजपाला पराभवाचा सामना करावा लागतो, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, महाराष्ट्रात आमचोसोबत धोका झाल्याचं नड्डा यांनी म्हटलंय.   महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि दिल्लीत प्रादेशिक पक्षांकडून भाजपाला पराभूत व्हावं लागलं, याबद्दल नड्डा यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना, उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबतच निवडणुकी लढवली होती. त्यामुळे महाराष्ट्रात आमचा पराभव झाला असून आम्हीच जिंकलेलो आहोत. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत हीच महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती. मात्र, महाराष्ट्रात आमच्यासोबत सत्तेसाठी धोका झालाय, असे उत्तर नड्डा यांनी दिले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्याShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे