वैद्यकीय सल्ल्याच्या बाबतीत सध्या एक अत्यंत चिंताजनक कल समोर येत आहे. नागरिक अधिकृत सरकारी आरोग्य सल्ल्यापेक्षा सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप फॉरवईसवर अधिक विश्वास ठेवत असल्याचे ताज्या अभ्यासात दिसून आले आहे. डॉक्टरांच्या टीमने केलेल्या या संशोधनाचे निष्कर्ष 'रिसर्च इंटरनॅशनल जर्नल ऑफ लाइफ सायन्सेस बायोटेक्नॉलॉजी अॅण्ड फार्मा रिसर्च' मध्ये प्रकाशित झाले आहेत. या संशोधनात सामील लोकांचे सरासरी वय ३२.८ वर्षे होते.
लोकांचा सर्वाधिक विश्वास अजूनही थेट डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनल्सवर (८.३/१०) असला तरी, डिजिटल माध्यमांमध्ये सरकारी माहितीपेक्षा अनधिकृत माहिती वरचढ ठरत आहे.
सोशल मीडियावरील 'विश्वासा'ची कारणे
वारंवारता : एखादी माहिती वारंवार समोर आली की ती खरी वाटते.
सोपी भाषा : ही माहिती घरातील व्यक्ती सांगत असल्यासारख्या अत्यंत सोप्या भाषेत असते.
वेळेची उपलब्धता : सरकारी रुग्णालयात डॉक्टरांशी संवाद साधायला वेळ कमी मिळतो, मात्र फोनवर २४ तास माहिती उपलब्ध असते.
आता यावर कोणते उपाय करायला हवे?
डॉक्टरांच्या मते, सरकारी आरोग्य विभागाने आता व्हॉट्सअॅप आणि फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवर अधिक सक्रिय होऊन सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने अचूक माहिती पोहोचवणे आवश्यक आहे.
Web Summary : Study reveals people trust social media health tips more than official advice. Easy language, 24/7 availability, and repeated exposure drive this trend. Doctors advise government to actively share accurate information on platforms like WhatsApp and Facebook in a simple, engaging way.
Web Summary : अध्ययन में खुलासा: लोग सरकारी सलाह से ज़्यादा सोशल मीडिया हेल्थ टिप्स पर भरोसा करते हैं। आसान भाषा, चौबीसों घंटे उपलब्धता और बार-बार सामने आना इस प्रवृत्ति को बढ़ावा देते हैं। डॉक्टरों की सलाह है कि सरकार व्हाट्सएप और फेसबुक जैसे प्लेटफार्मों पर सरल और आकर्षक तरीके से सटीक जानकारी साझा करे।