शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

By admin | Updated: February 13, 2015 23:11 IST

हायकोर्ट : जबाबदार अधिकारी नेमण्याचे निर्देश

हायकोर्ट : जबाबदार अधिकारी नेमण्याचे निर्देश

नागपूर : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या रखडलेल्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने संघाची निवडणूक घेण्यासाठी २३ फेब्रुवारीपर्यंत जबाबदार अधिकारी नेमण्याचे निर्देश उपधर्मादाय आयुक्तांना दिले आहेत. संघाच्या घटनेतील नियमानुसार आवश्यक कालावधीत निवडणूक प्रकिया पूर्ण करण्यात यावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणूक नागपुरात होणार आहे.
संघाच्या कार्यकारी मंडळात २४ विविध पदाधिकारी व सदस्यांचा समावेश असून कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. २००६ मध्ये झालेल्या निवडणुकीत माजी आमदार वसंत खोटरे अध्यक्ष झाले होते. यानंतर अंतर्गत वादामुळे संघाची निवडणूकच झाली नाही. १८ एप्रिल २०१३ रोजी संघाच्या एका गटाने सभा घेऊन ५ मे २०१३ रोजी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी खोटरे गटाने ४ मे २०१३ रोजी निवडणूक जाहीर केली. याविरुद्ध प्रतिस्पर्धी गटाने उपधर्मादाय आयुक्तांकडे याचिका दाखल केली होती. उपधर्मादाय आयुक्तांनी ही याचिका मंजूर करून ४ मे रोजीची निवडणूक अवैध ठरविली होती. या निर्णयाला खोटरे व इतरांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे ५ मे रोजी निवडणूक होऊ शकली नाही. यानंतर आनंद कारेमोरे यांच्यासह संघाच्या १४ आजीवन सदस्यांनी अंतरिम आदेश मागे घेण्यासाठी मध्यस्थी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने वरीलप्रमाणे निर्देश देऊन हे प्रकरण निकाली काढले आहे. मध्यस्थी अर्जदारांतर्फे ॲड. पुरुषोत्तम पाटील यांनी बाजू मांडली.