पाटस टोलनाक्यावर दगडफेक

By Admin | Updated: June 8, 2015 04:49 IST2015-06-07T23:42:00+5:302015-06-08T04:49:18+5:30

पाटस टोलनाक्यावर दगडफेक

Patas TolaNak | पाटस टोलनाक्यावर दगडफेक

पाटस टोलनाक्यावर दगडफेक

पाटस टोलनाक्यावर दगडफेक
पाटस (जि. पुणे) : येथील टोल नाक्यावर टोलवरून वाहनचालकाशी कर्मचार्‍यांशी झालेल्या वादावरून भाडोत्री गुंडाना बोलवून टोलनाक्यावर सशस्त्र हल्ला करुन दगडफेक केली. तसेच कर्मचार्‍यांना मारहाण केली. यात टोलचे नुकसान झाले असून दोन कर्मचारी जखमी झाले आहे.
दुपारी सव्वा चारच्या सुमारास पुण्याच्या दिशेने छोटी चारचाकी गाडी आली. यावेळी टोल देण्याच्या कारणावरुन गाडीतील काही व्यक्तींनी टोल नाक्यावरील कर्मचार्‍यांना दमदाटी केली. यावेळी गाडीतील प्रवाशी आणि कर्मचारी यांच्यात वाद झाला. मात्र तो मिटल्यानंतर ती गाडी भिगवणला गेली. मात्र, ही गाडी पुन्हा टोलनाक्यावर आली. त्यावेळी तेथे त्यांच्यासमवेत ५० ते ६० गावगुंड हॉकी स्टिकसह अन्य शस्त्र घेऊन आले. त्यांनी कर्मचार्‍यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. अचानक केलेल्या हल्ल्याने कर्मचारी जीवमुठीत घेऊन सैरावैरा पळत होते. जमावातील काही लोकांनी टोल नाक्यावर दगडफेक केल्याने टोलनाक्याच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. तसेच एका दुचाकीवर दगडफेक करुन या दुचाकीचे नुकसान करुन सर्व पळून गेले.
घटनास्थळी दौंड आणि यवतच्या पोलिसांनी पाहणी केली. मात्र टोलनाक्यातील कुठलाही जबाबदार अधिकारी या घटनेच्या वेळी टोलनाक्यात उपस्थित नसल्याचे समजते. रात्री उशिरापर्यंत या संदर्भात पोलीसांनी कुठलाही गुन्हा नोंद केला नव्हता. पाटस टोलनाक्याचे व्यवस्थापक उत्तम सिंह म्हणाले, झालेल्या मारहाणीत आमचे दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.
--

Web Title: Patas TolaNak