शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

संसदीय समिती करणार ईव्हीएम प्रकरणाची चौकशी

By admin | Updated: March 15, 2017 04:09 IST

बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांची उत्तर प्रदेशातील निवडणुकीत मतदान यंत्रांमध्ये हेराफेरी झाली असल्याची तक्रार निवडणूक आयोगाने फेटाळली असली

हरीश गुप्ता , नवी दिल्लीबहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांची उत्तर प्रदेशातील निवडणुकीत मतदान यंत्रांमध्ये हेराफेरी झाली असल्याची तक्रार निवडणूक आयोगाने फेटाळली असली तरी संसदीय स्थायी समितीने याची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा व महानगरपालिकांच्या निवडणुकीमधील मतदान यंत्रांत हेराफेरी झाल्याच्या तक्रारींची ही समिती चौकशी करणार आहे.‘लोकमत’शी बोलताना गृह विभागाच्या समितीचे अध्यक्ष आनंद शर्मा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील विविध शहरे व जिल्ह्यांतून याबाबत तक्रारी आल्या आहेत. तसेच याचे पुरावेही पाठविण्यात आले आहेत. विशेषत: पुणे, नाशिक, धुळे व इतरही ठिकाणांहून अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. एका उमेदवाराने तर अशी तक्रार केली आहे की, जिल्हा परिषदेसाठी माझ्या कुटुंबात २८ सदस्य आहेत. तरीही मतदान यंत्राने मला एकही मत पडल्याचे दाखवले नाही. समिती या तक्रारी एकत्रित करीत आहे व माहितीची शहानिशा केली जात आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी समितीच्या संपर्कात आहेत व बारकावे तपासत आहे. याबाबत अधिक काही बोलण्यास नकार देत शर्मा म्हणाले की, आम्ही आता चौकशी करीत आहोत. मतदान यंत्रात केलेल्या प्रत्येक मताची कागदी नोंद ठेवली जावी, या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाबाबतही समिती विचार करणार आहे. तथापि, ही समिती उत्तर प्रदेशसह इतर राज्यांतील विधानसभा निवडणुकीत मतदान यंत्रात हेराफेरी झाल्याच्या एकाही आरोपाची चौकशी करीत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ईव्हीएमप्रणालीचा तपास करणारी स्थायी समिती मतदान यंत्रातील हेराफेरीच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक अभियंते, पुरवठादार आणि तज्ज्ञांची मदत घेणार आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील आगामी एमसीडी निवडणुकीत ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांचा वापर करण्याची मागणी केली आहे.