शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येमुळे संसद हळहळली

By admin | Updated: April 24, 2015 02:24 IST

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सभा सुरू असताना शेतकऱ्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्यामुळे संसदेने गुरुवारी तीव्र दु:ख आणि संताप व्यक्त केला.

नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सभा सुरू असताना शेतकऱ्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्यामुळे संसदेने गुरुवारी तीव्र दु:ख आणि संताप व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकार शेतकऱ्यांना मरू देणार नाही, अशी ग्वाही देत विरोधकांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. हा अतिशय खोलवर रुजलेला आणि व्यापक असा प्रश्न असून तो सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.सभागृहात दोन तास चाललेल्या चर्चेत राजस्थानमधील शेतकरी गजेंद्रसिंग याने दिल्लीत झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याबद्दल सर्वच सदस्यांनी राजकीय भेद बाजूला सारत भावना व्यक्त केल्या. या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही त्यांनी केली. राज्यसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सीबीआय चौकशीची मागणी लावून धरतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याखेरीज अन्य कुणाचे निवेदन चालणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. तत्पूर्वी शून्य तासाला मुद्दा उपस्थित करताना विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद म्हणाले की, गजेंद्रसिंग याच्या आत्महत्येसाठी केंद्र आणि दिल्ली सरकार जबाबदार आहे. या घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले असल्याने सभागृहाचे कामकाज थांबवून चर्चा करायला हवी. लोकसभेत गदारोळ लोकसभेत कामकाज सुरू होताच जोरदार नारेबाजी करीत विरोधी पक्षांनी या मुद्यावर चर्चेची मागणी केली. सरकारने नंतर ती मान्यही केली; मात्र गदारोळातच काही मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आले. काँग्रेसच्या सदस्यांनी प्रश्नोत्तराचा तास निलंबित ठेवण्याची मागणी केली; मात्र अध्यक्षांनी ती फेटाळली. काँग्रेसच्या सदस्यांनी ‘किसानविरोधी सरकार नही चलेगी’ अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. (लोकमत न्यूज नेटवर्क)