"ज्या योजनेची तुम्ही खिल्ली उडवलीत, आज त्याच योजनेत...", सोनिया गांधी 'मनरेगा'वरुन मोदी सरकारवर बरसल्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 05:03 PM2022-03-31T17:03:36+5:302022-03-31T17:04:07+5:30

Parliament News: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी लोकसभेत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. नरेंद्र मोदी सरकारनं मनरेगा योजनेताल कमकुवत केल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. 

parliament congress chief sonia gandhi hits out at modi govt over nrega cuts in loksabha | "ज्या योजनेची तुम्ही खिल्ली उडवलीत, आज त्याच योजनेत...", सोनिया गांधी 'मनरेगा'वरुन मोदी सरकारवर बरसल्या!

"ज्या योजनेची तुम्ही खिल्ली उडवलीत, आज त्याच योजनेत...", सोनिया गांधी 'मनरेगा'वरुन मोदी सरकारवर बरसल्या!

Next

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी लोकसभेत मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. नरेंद्र मोदी सरकार 'मनरेगा'ला कमकुवत करत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला. "काही वर्षांपूर्वी 'मनरेगा'ची काही लोकांकडून खिल्ली उडवली गेली, कोविड-19 आणि लॉकडाऊनमध्ये कोट्यवधी गरीब कुटुंबांना वेळेत मदत केली आणि सरकारला वाचवण्यातही महत्त्वाची भूमिका 'मनरेगा'नं बजावली. असं असतानाही 'मनरेगा'च्या बजेटमध्ये सातत्यानं कपात केली जात आहे", असा हल्लाबोल सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव घेता केला.

"सध्या देशात वेळेवर पेमेंट आणि नोकऱ्यांची कायदेशीर हमी कमकुवत होत आहे. बेरोजगारी सातत्यानं वाढत आहे, तरीही २०२० च्या तुलनेत यंदा 'मनरेगा'चं बजेट ३५ टक्क्यांनी कमी करण्यात आलं आहे. अर्थसंकल्पातील कपातीमुळे कामगारांच्या पगाराला विलंब होत आहे", असा आरोप सोनियांनी लोकसभेतील भाषणात केला. दुसरीकडे, गुरुवारी राज्यसभेत ७२ सदस्यांना निरोप देण्यात आला. राज्यसभेत १९ राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या सदस्यांचा कार्यकाळ मार्च ते जुलै दरम्यान पूर्ण होत आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये एके अँटनी, आनंद शर्मा, काँग्रेसच्या अंबिका सोनी, कपिल सिब्बल, भारतीय जनता पक्षाचे सुरेश प्रभू, सुब्रमण्यम स्वामी, बहुजन समाज पक्षाचे सतीशचंद्र मिश्रा, शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांचा समावेश आहे.

निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, मुख्तार अब्बास नक्वी आणि आरसीपी सिंग या मंत्र्यांचा देखील समावेश आहे. नामनिर्देशित सदस्य एमसी मेरी कोम, स्वपन दासगुप्ता आणि नरेंद्र जाधव यांचाही कार्यकाळ संपुष्टात येत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेच्या निवृत्त सदस्यांना चांगल्या भविष्यासाठी शुभेच्छा देताना त्यांचे अनुभव देशाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जावेत आणि देशाच्या भावी पिढीला प्रेरणा द्यावी, असं आवाहन केलं. निवृत्त होणाऱ्या सदस्यांकडे अनुभवाचा मोठा खजिना असतो आणि कधी कधी ज्ञानापेक्षा अनुभवाची ताकद जास्त असते, असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. 

Web Title: parliament congress chief sonia gandhi hits out at modi govt over nrega cuts in loksabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.