शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
3
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांना भाजपाला इशारा
4
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
5
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
6
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
9
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
10
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
11
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
12
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
13
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
14
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
15
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
16
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
17
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
18
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
19
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
20
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?

पुन्हा मोदींचीच सत्ता येण्याचा संकेतांमुळे पाकिस्तानात अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 10:43 AM

गुरुवारी जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. केवळ देशाचीच नव्हे तर शेजारच्या पाकिस्तानचीही नजर या निकालांकडे आहे.

नवी दिल्ली - गुरुवारी जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. केवळ देशाचीच नव्हे तर शेजारच्या पाकिस्तानचीही नजर या निकालांकडे आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात सत्तांतर होणार की मोदींची सत्ता कायम राहणार याची उत्सुकात पाकिस्तानी नागरिक आणि उच्चपदस्थामध्ये आहे. त्यातही भारतात पुन्हा मोदींची सत्ता येऊ नये, असे अनेक पाकिस्तानी नागरिकांना वाटते. काही महिन्यांपूर्वी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानी हद्दीत घुसून केलेली एअरस्ट्राइक हे त्यामागचे कारण असल्याचे बोलले जात आहे.  पाकिस्तानी नागरिक नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या पुन्हा सत्तेत येण्याबाबतचे मत तेथील वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. तसेच अनेक पाकिस्तानी नागरिकांकडून सोशल मीडियावरही  भारतातील निवडणुकांसंदर्भातील पोस्ट शेअर केल्या जात आहेत. यासंदर्भातील वृत्त हिंदी संकेतस्थळ नवभारत टाइम्सने प्रसारित केले आहे. 

मोदींनी पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राइक केली होती. त्यामुळे ते पुन्हा सत्तेत येता कामा नये, असे लाहोर येथे राहणाऱ्या शाही आलम यांनी वृत्तवाहिनीला सांगितले. तर  मोदी पुन्हा बहुमताने सत्तेवर येतील याबाबत माझ्या मनात शंका आहे. त्यांना बहुमत मिळणार नाही, ही बाब पाकिस्तानच्या दृष्टीने चांगली असेल, असे अन्य एका व्यक्तीने सांगितले. दरम्यान, मोदी पुन्हा पंतप्रधान बनल्यास दोन्ही देशांमधील शांतता चर्चेची शक्यता वाढेल, अशी आशा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काही महिन्यांपूर्वी व्यक्त केली होती.  मात्र पाकिस्तानमध्ये राहणाऱ्यांपेक्षा देशाबाहेर राहणाऱ्या पाकिस्तानी व्यक्तींची मोदींबाबतची भूमिका वेगळी आहे. लंडन येथे राहणारे पाकिस्तानी उद्योगपती रियाझ सांगतात की, ''मोदी पुन्हा सत्तेत आले पाहिजेत. त्यामुळे पाकिस्तानी भूमीवरून चालणाऱ्या दहशतवादी संघटनांना आळा बसू शकेल. तसेच पाकिस्तानी सरकारवर दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी मोदी दबाव आणू शकतात.''   

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान