शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

पाकची पुन्हा आगळीक, अंदाधुंद गोळीबार

By admin | Updated: March 14, 2017 00:24 IST

पुुँछ सीमारेषेवर पाकिस्तानची आगळीक सुरूच असून, त्यांच्या सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सोमवारी अंदाधुंद गोळीबार केल्याने येथील व्यापार सुविधा केंद्राचे नुकसान झाल्याने सीमेवरील

जम्मू : पुुँछ सीमारेषेवर पाकिस्तानची आगळीक सुरूच असून, त्यांच्या सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सोमवारी अंदाधुंद गोळीबार केल्याने येथील व्यापार सुविधा केंद्राचे नुकसान झाल्याने सीमेवरील आवक जावक रोखण्यात आली. भारतीय जवानांनीही नंतर या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले.सुरक्षा प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैनिकांनी सोमवारी सकाळी पावणेसात वाजल्यापासून नियंत्रणरेषेनजीक भारतीय चौकी आणि नागरिकांना लक्ष्य बनवत गोळीबार सुरू केला. कोणतेही कारण नसताना पाकिस्तानने अचानक ही आगळीक केल्याचे प्रवक्त्याने सांगितले. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतीय जवानांनी सडेतोड प्रत्यूत्तर दिल्याचेही त्याने सांगितले. त्यानंतर पाकिस्तानकडून गोळीबार कमी करण्यात आला. सध्या तुरळक प्रमाणात गोळीबार सुरू असून, आमच्या सेनेचे कोणतेही नुकसान झालेले नाही, असे या प्रवक्त्याने सांगितले. जिल्हा प्रशासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारामुळे सीमेपलीकडे होणारी पुँछ-रावळकोट बससेवा स्थगित करण्यात आली आहे. पुँछच्या चकन-दा-बाग परिसरात असणाऱ्या व्यापार सुविधा केंद्राच्या दुमजली इमारतीचे नुकसान झाले. त्यामुळे ही इमारत मोकळी करण्यात आली. या घटनेची संरक्षण मंत्रालय योग्य ती दखल घेईल, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले असून, पाकिस्तानच्या आगळीकीला सडेतोड प्रत्युत्तर देण्यात येईल, असे सांगितले.