Coronavirus: आमचे आर्थिक पॅकेजही तुमच्या GDPपेक्षा मोठे, भारतानं पाकला दाखवला आरसा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 09:27 PM2020-06-11T21:27:03+5:302020-06-11T21:39:28+5:30

भारताचं बोलायचं झाल्यास आमचे आर्थिक मदत पॅकेजही पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा मोठे आहे.

pakistan pm imran khan offer india stimulus package is as large as the gdp pakistan | Coronavirus: आमचे आर्थिक पॅकेजही तुमच्या GDPपेक्षा मोठे, भारतानं पाकला दाखवला आरसा

Coronavirus: आमचे आर्थिक पॅकेजही तुमच्या GDPपेक्षा मोठे, भारतानं पाकला दाखवला आरसा

googlenewsNext

नवी दिल्ली- पाकिस्तानचे  पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला दिलेल्या मदतीच्या ऑफरची भारतानं खिल्ली उडवली आहे. भारतातील 34 टक्के घर विनामदतीशिवाय 1 आठवडेही जगू शकत नाहीत. मी भारताला मदत करून आमच्या ट्रान्सफर प्रोग्रामला जनतेपर्यंत पोहोचवू शकतो, असा दावा इम्रान खान यांनी केला होता. त्याचा आता भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव खरपूस समाचार घेतला आहे. अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, पाकिस्तानने हे लक्षात ठेवले पाहिजे की, त्यांच्यावर एकूण जीडीपीच्या 90 टक्के कर्ज आहे.

भारताचं बोलायचं झाल्यास आमचे आर्थिक मदत पॅकेजही पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा मोठे आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी सांगितले होते की, भारताच्या 34 टक्के कुटुंबांना आर्थिक मदत करण्यासाठी आम्हाला त्यांची मदत करायची आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनुराग श्रीवास्तव यांनी इम्रान सरकारला आरसा दाखवला आहे. या कार्यक्रमांतर्गत 1 कोटी कुटुंबांपर्यंत नऊ आठवड्यांत 120 अब्ज रुपये यशस्वीपणे पोहोचविल्याचा  दावा पाकिस्ताननं केला आहे.

 

जुलै-ऑगस्टमध्ये कोरोना विषाणूची साथीची पातळी शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याचा प्रभाव कमी होईल. म्हणूनच आज मी तुम्हाला अपील करतो की तुम्ही माझ्यासाठी नव्हे तर स्वत: साठी, तुमच्या प्रियजनांसाठी, वृद्धांना आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांसाठी खबरदारी घ्या. बहुतेक लोक नियमांचे उल्लंघन करत असून, हा व्हायरस फक्त एक सामान्य फ्लू असल्याचं त्यांना वाटत आहे. पण हा व्हायरस जीवघेणा आहे. त्यामुळे नियम न पाळून दुसऱ्यांचे जीव धोक्यात घालू नका, असं आवाहनही पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जनतेला केलं आहे. 

भारतीयांच्या खात्यावर त्वरित पैसे पाठवण्याची गरज
शिकागो विद्यापीठ आणि मुंबईच्या इन्स्टिट्यूट सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इंडियन इकॉनॉमीच्या अहवालात हा दावा केला गेला आहे. या अहवालात असं म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे सुमारे ८४ टक्के कुटुंबांच्या उत्पन्नामध्ये घट झाली आहे. एकूण कुटुंबांपैकी एक तृतीयांश अतिरिक्त मदतीशिवाय आठवड्यापेक्षा जास्त काळ जगू शकत नाहीत. भारतीयांना त्वरित पैसे आणि अन्न देण्याची नितांत आवश्यकता आहे असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा

...तर चीन, पीओकेमध्ये होऊ शकतो मोठा विनाश; काशीच्या ज्योतिषाची भविष्यवाणी

आरक्षण हा कधीही मूलभूत अधिकार होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयानं केलं स्पष्ट 

चीनमधून बाहेर पडलेल्या कंपन्या भारतात नव्हे, तर मग नेमक्या जातात कुठे?, जाणून घ्या 'सत्य'

...म्हणून भारताच्या बहुप्रतीक्षित ‘मिशन गगनयान’च्या उड्डाणाला विलंब होणार 

CoronaVirus News : संक्रमण आणखी वाढण्याची भीती; लोकल सुरू करून काय करणार?; राणेंनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

51 कोटी लोकांच्या खात्यात कोट्यवधी दिले, अमित शहांच्या दाव्यावर प्रकाश राज यांचा पलटवार

Web Title: pakistan pm imran khan offer india stimulus package is as large as the gdp pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.