शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

देश-परदेश- पाकिस्तान स्फोट (सुधारित)

By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST

पाकिस्तानात आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात ६१ ठार

पाकिस्तानात आत्मघाती बॉम्ब हल्ल्यात ६१ ठार
कराची : पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील एका धार्मिकस्थळी झालेल्या आत्मघाती बॉम्ब हल्यात ६१ जण ठार, तर अन्य ५५ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये काही मुलांचाही समावेश असून जखमींपैकी अनेकांची स्थिती चिंताजनक आहे. अलीकडच्या काळातील हा सर्वात भीषण हल्ला आहे.
शुक्रवारी प्रार्थनेसाठी लोक जमलेले असताना शिकारपूर जिल्‘ातील लाखी दर येथील धार्मिकस्थळी हा स्फोट झाला. या भीषण स्फोटाने या इमारतीचे छप्पर कोसळून ढिगार्‍याखाली अनेक जण अडकले. जुंदुल्ला दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनेने गेल्यावर्षी तालिबानशी संबंध तोडून इसिसशी नाते जोडले आहे. आमचे लक्ष्य शिया होते, कारण ते आमचे शत्रू आहेत, असे या संघटनेचा प्रवक्ता फहद मार्वत याने म्हटले आहे.
पंतप्रधान नवाज शरीफ हे कराची भेटीवर असतानाच हा हल्ला झाला. त्यांनी या हल्ल्याचा निषेध करून तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.
शिकारपूरचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक साकीब इस्माईल यांनी सांगितले, प्राथमिक तपासानुसार हा आत्मघाती हल्ला असल्याचे म्हटले आहे. स्फोट भयानक होता. त्यामुळे या इमारतीचे छत कोसळले. ढिगार्‍याखाली अडकल्याने अनेक जण गुदमरुन ठार झाले.
हा स्फोट झाला तेव्हा या ठिकाणी ४०० पेक्षा अधिक भाविक होते. स्फोटाची भीषणता पाहता मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, असे या सामाजिक संस्थेचे पदाधिकारी फरहान खान यांनी सांगितले.
एका व्यक्तीने सोबत स्फोटक उपकरण आणले होते. त्यानेच हा स्फोट केला, असे शिकारपूरचे पोलिस उप महानिरीक्षक रखिओ मिराणी यांनी सांगितल्याचे वृत्त जिओ टीव्हीने दिले.
जखमींना कार, मोटारसायकली आणि रिक्षातून इस्पितळात नेण्यासाठी लोक धावपळ करीत होते. घटनास्थळावरून दृश्य थरकाप उडविणारे होते.