शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर मुद्द्यावरील चर्चेसाठी पाकचे भारताला निमंत्रण

By admin | Updated: August 16, 2016 01:19 IST

भारत आणि पाकिस्तानने एकत्रितपणे काश्मीर प्रश्न सोडवणे हे दोन्ही देशांचे आंतरराष्ट्रीय दायित्व आहे, असे सांगत पाकिस्तानने भारताला या मुद्द्यावर चर्चेसाठी निमंत्रित केले आहे.

इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तानने एकत्रितपणे काश्मीर प्रश्न सोडवणे हे दोन्ही देशांचे आंतरराष्ट्रीय दायित्व आहे, असे सांगत पाकिस्तानने भारताला या मुद्द्यावर चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. भारत केवळ भारत-पाक संबंधांतील सद्य:स्थितीत महत्त्वाच्या असणाऱ्या मुद्द्यांवर आणि पाकव्याप्त काश्मीरविषयी चर्चा करण्यास तयार असून, जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतेच संसदेत स्पष्ट केले होते, तरीही पाकने काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चेसाठी निमंत्रित केले आहे.चर्चेचे निमंत्रण पाकिस्तानातील भारताचे उच्चायुक्त गौतम बंबावाले यांना देण्यात आल्याचे, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झकारिया यांनी सोमवारी सांगितले. भारत-पाक संबंधांत काश्मीर हा महत्त्वाचा वादाचा मुद्दा असल्यामुळे, या विषयावर चर्चेसाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांना निमंत्रित केल्याचे झकारिया यांनी सांगितले. काश्मीर मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानात सुरू असलेल्या शाब्दिक चकमकींमुळे दोन्ही देशांच्या संबंधांत तणाव आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावानुसार, जम्मू-काश्मीरचा मुद्दा सोडवणे ही दोन्ही देशांची जबाबदारी आहे, असे या निमंत्रणात म्हटले आहे. भारत केवळ सद्य:स्थितीतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.