शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
6
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
7
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
8
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
9
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
10
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
11
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
12
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
13
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
14
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
15
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
16
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
17
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
18
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
19
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
20
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर

हाय अलर्ट ! प्रजासत्ताक दिनापूर्वी सीमारेषेवर मोठा हल्ला घडवण्याचा पाकिस्तानचा कट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 4:52 PM

Jammu kashmir : काश्मीर खोऱ्यामध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र स्वरुपात राबवण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जवानांच्या कारवाईमुळे बिथरलेल्या पाकिस्ताननं सीमारेषेवर स्नायपर्स आणि बॉर्डर अ‍ॅक्शन टीम तैनात केल्याची माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देभारतीय लष्कराच्या प्रमुख चौक्यावर पाकिस्‍तानचा निशाणानियंत्रण रेषेवर पाकिस्‍तानकडून स्‍नायपर्स तैनात26 जानेवारीपूर्वी सीमारेषेवर हल्ला करण्याचा पाकिस्तानचा कट

श्रीनगर - काश्मीर खोऱ्यामध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधातील मोहीम तीव्र स्वरुपात राबवण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जवानांच्या कारवाईमुळे बिथरलेल्या पाकिस्ताननं सीमारेषेवर स्नायपर्स आणि बॉर्डर अ‍ॅक्शन टीम तैनात केल्याची माहिती समोर आली आहे. सीमारेषेवर दहशतवाद्यांनी अनेक तळ उभारल्याची माहिती सॅटलाइटद्वारे मिळालेल्या चित्रांद्वारे स्पष्ट झाली आहे. 26 जानेवारीपूर्वी पाकिस्तानी स्नायपर्स आणि बॉर्ड अ‍ॅक्शन टीम भारतीय जवानांवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती समोर आली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून भारतीय लष्करानं कठोर मोहीम राबवत दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यामुळे पाकिस्तान सैरभैर झाला आहे. भारतीय जवानांवर भ्याड हल्ला करण्याचा कट पाकिस्तानात रचला जात आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, मोहम्मद अशरफच्या मदतीनं पाकिस्तान भारतीय जवानांवर हल्ला करण्याचा कटकारस्थान रचत आहे. मोहम्मद सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये वास्तव्यास आहे. त्याच्या मदतीनं पाकिस्तानला तंगधार परिसरात मोठा हल्ला घडवायचा आहे. भारतीय जवानांच्या प्रमुख चौक्यांवर पाकिस्तानचे लक्ष्य आहे. सुरक्षा यंत्रणांमधील सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर भारतीय जवान सतर्क झाले आहेत. 

दरम्यान, सीमारेषेपलिकडून वारंवार भ्याड हल्ला करणाऱ्यांचं कंबरडं मोडण्यासाठी भारतीय लष्करानं मोहीम हाती घेतली आहे. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम लष्कराने अधिकच तीव्र केल्याचं दिसत आहे. भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई राबवत कधी काळी हिज्बुलचा गड मानल्या जाणाऱ्या काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्याला दहशवादमुक्त केले आहे. दहशतवादाविरोधातील भारतीय लष्कराच्या मोहीमेला मिळालेले हे मोठे यश आहे. 

जवानांच्या यशस्वी कारवाईनंतर बारामुल्ला जिल्हा दहशवादमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. दहशतवादमुक्त म्हणून घोषित करण्यात आलेल्या उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला हा पहिलाच जिल्हा असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी (23 जानेवारी) बारामुल्लामध्ये तीन दहशवाद्यांना यमसदनी धाडल्यानंतर भारतीय लष्कराकडून या जिल्ह्याला दहशतवादमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले. 

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तान