शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनात गडबड करण्याचे ना’पाक’ कारस्थान, रचले असे षडयंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 21:36 IST

Farmer Protest : शेतकरी आंदोलनादरम्यान गोंधळ घालण्यासाठी पाकिस्तानकडून रचण्यात आलेल्या मोठ्या कारस्थानाचा उलगडा पोलिसांनी केला आहे.

नवी दिल्ली - कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता दोन महिने पूर्ण होत आले आहेत. आता या कृषी कायद्यांचा निषेध करण्यासाठी प्रजासत्ताक दिनी शेतकरी भव्य ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. मात्र यादरम्यान, शेतकरी आंदोलनादरम्यान गोंधळ घालण्यासाठी पाकिस्तानकडून रचण्यात आलेल्या मोठ्या कारस्थानाचा उलगडा पोलिसांनी केला आहे.शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला परवानगी देण्यात आली असली तरी प्रजासत्ताक दिनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली पोलीस अलर्टवर आहेत. दरम्यान शेतकरी आंदोलनात गडबड करण्यासाठी पाकिस्तानने ट्विटरवरून कारस्थान रचल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच पाकिस्तानमधून हँडल होत असलेल्या ३०८ ट्विटर अकाऊंटची पडताळणी पोलिसांकडून सुरू असून, हे अकाऊंट ब्लॉक करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.याबाबत दिल्ली पोलिसांचे स्पेशल कमिश्नर दीपेंद्र पाठक यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या नियोजित ट्रॅक्टर रॅलीमध्ये गडबड करण्यासाठी कारस्थान रचले जात असल्याची माहिती आम्हाला गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी ३०८ ट्विटर अकाऊंट्स उघडण्यात आली आहेत. त्यामाध्यमातून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे.दरम्यान, ट्रॅक्टर रॅलीबाबत दिल्लीच्या स्पेशल कमिश्नरांनी सांगितले की, आज शेतकऱ्यांसोबत झालेला संवाद चांगला झाला. दिल्लीतील तीन ठिकाणांहून ट्रॅक्टर रॅली काढण्याची परवानगी दिली आहे. या तिन्ही सीमांवरून बॅरिकेड्स हटवण्यात येतील. या बॅरिकेड्स हटवून आंदोलकांना काही किलोमीटर आत येऊ दिले जाईल, असेही पाठक यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :Farmerशेतकरीdelhiदिल्लीPakistanपाकिस्तानPoliceपोलिस