ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 18:12 IST2025-05-18T18:11:31+5:302025-05-18T18:12:02+5:30
Pahalgam Terror Attack Connection With Jyoti: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आली आहे.

ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
Jyoti Malhotra Pahalgam Terror Attack Link: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राबद्दल दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. रविवारी (18 मे 2025) हिसारचे एसपी शशांक कुमार सावन यांनी मोठी माहिती दिली आहे. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा ज्योती पाकिस्तान उच्चायुक्तालयातील दानिशच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे.
एसपी शशांक कुमार यांनी सांगितले की, हरियाणा पोलिसांना केंद्रीय एजन्सीकडून इनपुट मिळाले होते, ज्याच्या आधारे त्यांनी ज्योती मल्होत्राला अटक केली. ती अनेक वेळा पाकिस्तान आणि चीनला गेली होती. सध्या तिला 5 दिवसांच्या रिमांडवर ठेवण्यात आले आहे. सोशल मीडियावरील तिच्या व्हिडिओंनुसार, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या 3 महिने आधी ती श्रीनगरला गेली होती. या काळात तिने पहलगामलाही भेट दिली. पोलीस या सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
#WATCH | Hisar | "They were developing her (Jyoti Malhotra) as an asset. She was in touch with other YouTube influencers, and they were also in touch with the PIOs... She used to go to Pakistan, like on sponsored trips... She was in Pakistan before the Pahalgam attack, and the… pic.twitter.com/OD2wD1vzic
— ANI (@ANI) May 18, 2025
पहलगाम हल्ल्यापूर्वी ज्योती पाकिस्तानात
अलीकडील भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यानही ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती, असेही पोलिस अधिकाऱ्याने उघड केले. एवढेच नाही तर पहलगाम हल्ल्यापूर्वी ती पाकिस्तानात होती. या घटनेत तिचा काही संबंध आहे का, त्याचाही तपास केला जात आहे.
विरोधात या कलमांखाली गुन्हा दाखल
ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्राला हेरगिरी आणि पाकिस्तानी गुप्तहेरांना संवेदनशील माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाल्यानंतर या आठवड्यात हरियाणामधून झालेली ही तिसरी अटक आहे. हिसार येथील रहिवासी असलेल्या मल्होत्राने पाकिस्तानी हँडलरला संवेदनशील माहिती शेअर केल्याची कबुली दिल्यानंतर तिला अटक करण्यात आली. कलम 3 आणि 5, तसेच भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम 152 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.