Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 13:05 IST2025-04-27T13:05:30+5:302025-04-27T13:05:54+5:30

Pahalgam Terror Attack : दहशतवादी हल्ल्यात एकूण २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये कोची येथील रहिवासी आरती आर मेननचे वडील एन रामचंद्रन यांचा समावेश होता.

pahalgam terror attack arti menon lost her father says two brothers in kashmir | Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना

Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एकूण २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये कोची येथील रहिवासी आरती आर मेननचे वडील एन रामचंद्रन (६५) यांचा समावेश होता. पहलगामहून परतल्यानंतर माध्यमांशी बोलताना आरतीने त्या भयानक घटनेबद्दल सांगितलं.

माध्यमांशी बोलताना आरती म्हणाली, "सुरुवातीला आम्हाला वाटलं की तो फटाक्याचा आवाज आहे पण पुढच्या वेळी गोळी झाडली गेली तेव्हा मला कळलं की हा दहशतवादी हल्ला आहे." आरतीचे वडील आणि त्यांची सहा वर्षांची जुळी मुले बैसरनमधील गवताळ प्रदेशातून चालत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. तिची आई शीला गाडीतच बसून राहिली.

Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

"आम्ही लोक सर्व दिशांना पळू लागलो. आम्ही पुढे जात असताना, जंगलातून एक माणूस बाहेर आला. त्याने थेट आमच्याकडे पाहिलं. तो अनोळखी व्यक्ती असं काही तरी शब्द बोलला जे आम्हाला समजले नाहीत. आम्ही उत्तर दिलं, आम्हाला माहित नाही. पुढच्याच क्षणी त्याने गोळीबार केला. माझे वडील खाली पडले. मी दोन माणसं पाहिली."

 हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल

"आम्ही सुमारे एक तास जंगलात भटकत राहिलो. माझी मुलं ओरडू लागली आणि तो माणूस पळून गेला. मला माहित होतं की माझे वडील गेले आहेत. मी मुलांना माझ्यासोबत घेऊन निघून गेले. जंगलात, मला माहित नव्हतं की मी कुठे जात आहे. त्यानंतर फोनवरून मी माझ्या ड्रायव्हरला फोन केला" असं आरतीने म्हटलं आहे. या भयंकर काळात तिला काश्मीरमधील अनोळखी लोकांकडून सहानुभूती मिळाली आणि ते तिच्याशी कुटुंबासारखे वागले. 

"विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"

"माझा ड्रायव्हर मुसाफिर आणि समीर, माझे भाऊ बनले. ते नेहमीच माझ्यासोबत उभे राहिले, मला शवागारात घेऊन गेले, आम्हाला मदत केली. मी पहाटे ३ वाजेपर्यंत तिथे वाट पाहिली. त्यांनी माझी बहिणीसारखी काळजी घेतली. मी वडील गमावले पण आता माझे दोन भाऊ काश्मीरमध्ये आहेत, अल्लाह तुम्हा दोघांचं रक्षण करो" असं आरती श्रीनगरहून परत येताना म्हटलं आहे. 
 

Web Title: pahalgam terror attack arti menon lost her father says two brothers in kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.