Pahalgam: भीतीवर मात करत पर्यटकांनी गजबजले पहलगाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 08:53 IST2026-04-22T08:52:22+5:302026-04-22T08:53:06+5:30

Pahalgam Terror Attack:  पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज, २२ एप्रिल रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे.

Pahalgam: Overcoming fear, tourists throng Pahalgam | Pahalgam: भीतीवर मात करत पर्यटकांनी गजबजले पहलगाम

Pahalgam: भीतीवर मात करत पर्यटकांनी गजबजले पहलगाम

सुरेश एस. डुग्गर
लोकमत न्यूज नेटवर्क

जम्मू: पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज, २२ एप्रिल रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. एक वर्षापूर्वी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या नरसंहारामुळे तेथील ओस पडलेली पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांनी गजबजली आहेत. पहलगाममध्येही त्यांची रीघ लागली आहे. अस्थिरता माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकला भारतीयांनी लगावलेली ही सणसणीत चपराक आहे.

मर्यादांचे उल्लंघन केल्यास चोख प्रत्युत्तर; भारतीय लष्कर

कोणीही मर्यादांचे उल्लंघन केल्यास त्याला ठोस प्रत्युत्तर दिले जाईल अशा इशारा भारतीय लष्कराने मंगळवारी पाकिस्तानचे व दहशतवाद्यांचे नाव न घेता दिला. पहलगाम हल्ल्याला वर्ष पूर्ण होण्याच्या पूर्वसंध्येला भारतीय लष्कराने म्हटले आहे की, दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात भारतीय जनता एकजुटीने सहभागी झाली 

काश्मीरमधील सरकार, अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांना आले मोठे यश

- पर्यटकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी जम्मू-काश्मीरमधील सरकार, अधिकाऱ्यांनी सुरक्षा यंत्रणा आणि नागरिकांच्या मदतीने गेल्या वर्षभरात मोठे प्रयत्न केले आहेत.

- त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले असून, भारतासह जगभरातून पर्यटक पुन्हा काश्मीरमध्ये येच आहेत. गेल्या महिन्यात देशभरातून ३.८ लाखांहून अधिक पर्यटकांनी श्रीनगरमधील प्रसिद्ध इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डनला भेट दिली. 

- पहलगाम हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या २६ जणांची नावे कोरलेले एक स्मारक तेथील नदीकाठी उभारण्यात आले असून, तिथे आता पर्यटक थांबून येथे श्रद्धांजली अर्पण करतात.

Web Title : पहलगाम में पर्यटन का पुनरुत्थान: आतंकी हमले के बाद पर्यटकों ने डर को हराया

Web Summary : पहलगाम आतंकी हमले के एक साल बाद, कश्मीर में पर्यटन फिर से शुरू हुआ। भारतीय सेना ने सीमा उल्लंघन के खिलाफ चेतावनी दी। सरकार के प्रयासों से पर्यटकों का विश्वास बहाल हुआ; पर्यटक उद्यानों और स्मारक स्थलों पर उमड़ रहे हैं, पीड़ितों को श्रद्धांजलि दे रहे हैं।

Web Title : Pahalgam Reclaims Tourism: Visitors Defy Fear After Terror Attack

Web Summary : A year after the Pahalgam terror attack, tourism rebounds in Kashmir. Indian army warns against border violations. Government efforts restore visitor confidence; tourists flock to gardens and memorial sites, honoring victims.