शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

पान २ : जमीन बळकाव कारस्थान हाणून पाडा : होबळे

By admin | Updated: May 5, 2015 01:20 IST

सावर्डे : गोव्यात हजारो कुटुंबांकडे ते कसत असलेल्या जमिनीची कागदपत्रे नाहीत. मात्र, त्यांना त्या जमिनी पूर्वजांपासून त्यांच्या जवळ आल्या आहेत. अशा कोणतीच कागदपत्रे नसलेल्या जमिनीतून पद्धतशीरपणे बाहेर काढून मागीलदाराने भाटकारांना हक्क देण्याचे कटकारस्थान सध्या सरकारने रचलेले आहे. त्याचा बिमोड करून आपल्या जमिनीचे हक्क शाबूत ठेवण्यासाठी राज्यातील सर्व बहुजन समाजातील घटकांनी एकत्र येऊन प्रतिकार करण्याची गरज आहे, असे विचार गोमंतक बहुजन महासंघाचे अध्यक्ष अनिल होबळे यांनी किर्लपाल येथे बोलताना व्यक्त केले.

सावर्डे : गोव्यात हजारो कुटुंबांकडे ते कसत असलेल्या जमिनीची कागदपत्रे नाहीत. मात्र, त्यांना त्या जमिनी पूर्वजांपासून त्यांच्या जवळ आल्या आहेत. अशा कोणतीच कागदपत्रे नसलेल्या जमिनीतून पद्धतशीरपणे बाहेर काढून मागीलदाराने भाटकारांना हक्क देण्याचे कटकारस्थान सध्या सरकारने रचलेले आहे. त्याचा बिमोड करून आपल्या जमिनीचे हक्क शाबूत ठेवण्यासाठी राज्यातील सर्व बहुजन समाजातील घटकांनी एकत्र येऊन प्रतिकार करण्याची गरज आहे, असे विचार गोमंतक बहुजन महासंघाचे अध्यक्ष अनिल होबळे यांनी किर्लपाल येथे बोलताना व्यक्त केले.
धारबांदोडा तालुक्यात जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या किर्लपालच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी महासंघाचे कार्याध्यक्ष प्रकाश वेळीप, सरचिटणीस डॉ. उदय गावकर, सचिव उपेंद्र गावकर, किर्लपालचे सरपंच कालिदास गावकर, पंच हनुमंत गावकर, संयुक्त खजिनदार रवींद्र माडकर, भंडारी समाजाचे केंद्रीय समितीचे सदस्य आनंद मंगेश नायक, वामन खांडेपारकर, बालसती देवस्थानचे अध्यक्ष शशिकांत गावकर, गणेश गावकर उपस्थित होते.
बहुजन समाजावर सध्या अन्याय होत असून त्यावर जाब विचारण्यासाठी प्रत्येक घटकाची पाठराखण करण्यासाठी अशा महासंघाची गरज होती. ती आता पूर्ण झालेली असली तरी आम्हाला आमची शक्ती दाखवून द्यायला हवी, असेही ते म्हणाले. बादीक समाजाला विविध प्रकारे सुधाण्यासाठी सदानंद स्वामी, ब्रšाानंद स्वामी व ब्रšोशानंद स्वामी यांचे मोलाचे योगदान असून बहुजन महासंघालाही त्यांचे आशीर्वाद मिळावे या हेतूने महासंघाच्या उद्घाटन समारंभाला ब्रšोशानंद स्वामी यांना आमंत्रित केल्याचे होबळे म्हणाले.
सध्या गोव्यात डिव्हाईड ॲण्ड रुल असे ब्रिटीश व पोर्तुगिजांचाच कित्ता गिरवण्यात येत असून त्यात बहुजन समाज भरडत चालला असल्याचे कार्याध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी सांगितले. आनंद वळवईकर यांनी सरकारवर दबाव आणण्यासाठी बहुजन समाजाची संघटित शक्ती दाखविणे योग्य ठरणार, असे सांगितले. या वेळी वामन खांडेपारकर यांनी वन खात्याकडून होणार्‍या सतावणुकीची माहिती देवून हा प्रश्नही महासंघामार्फत सोडविण्याची मागणी केली.
सरपंच कालिदास गावकर यांनी किर्लपालचे महासंघाला पूर्ण सहकार्य असेल, असे सांगितले. सचिव उपेंद्र गावकर यांनी गोमंतक बहुजन महासंघ स्थापनेचे उद्दिष्ट स्पष्ट केले. सुरुवातीस शशिकांत गावकर यांनी स्वागत केले. डॉ. उदय गावकर यांनी सूत्रसंचालन केले. पंच हनुमंत गावकर यांनी आभार मानले. (लो.प्र.)
फोटो :
गोमंतक बहुजन महासंघाच्या किर्लपाल येथील जागृती बैठकीत बोलताना महासंघाचे अध्यक्ष अनिल होबळे. बाजूला प्रकाश वेळीप, उपेंद्र गावकर, वामन खांडेपारकर, पंच हनुमंत गावकर, डॉ. उदय गावकर व इतर. (छाया : आनंद मंगेश नायक)