opposition parties meeting chaired sonia gandhi amid corona virus and amphan cyclone sna | केंद्र सरकारचे आर्थिक पॅकेज म्हणजे देशाची क्रूर थट्टा; विरोधी पक्षांच्या बैठकीत सोनिया गांधींचा मोदींवर निशाणा

केंद्र सरकारचे आर्थिक पॅकेज म्हणजे देशाची क्रूर थट्टा; विरोधी पक्षांच्या बैठकीत सोनिया गांधींचा मोदींवर निशाणा

ठळक मुद्देदेशातील कोरोना व्हायरसचे संकट आणि अम्फान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पार पडली विरोधी पक्षांची बैठकसोनिया गांधी म्हणाल्या, कोरोनाचा 21 दिवसांत खत्मा करण्याचा पंतप्रधानांचा दावा सफशेल फसलाकोरोना टेस्टिंग किटच्या आयातीतही झटका बसला -सोनिया गांधी

नवी दिल्ली : देशातील कोरोना व्हायरसचे संकट आणि अम्फान चक्रीवादळाचा तडाखा, या पार्श्वभूमीवर शुक्रवारी विरोधी पक्षांची बैठक झाली. व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगच्या माध्यमाने झालेल्या या बैठकीत, अम्फान चक्रीवादळ राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली. यावेळी बैठकीची सुरुवात करतानाच सोनिया गांधी यांनी कोरोनाच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला. 

अर्थव्यवस्थेला मोठा झटका -
सोनिया गांधी म्हणाल्या, अर्थव्यवस्थेला मोठा झटका बसला आहे. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञांनीही तत्काळ मोठ्या प्रमाणावर मदत निधी देण्यात यावा, असा सल्ला दिला आहे. पंतप्रधानांनी 12 मेरोजी 20 लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले. त्यानंतर अर्थमंत्र्यांनी पाच दिवस त्याची माहिती दिली. ही देशासोबत केलेली क्रूर थट्टा आहे.

Pakistan Plane Crash: शेवटच्या काही सेकंदांत कॉकपिटमध्ये काय घडलं, 'हे' होते पायलटचे शेवटचे शब्द

सरकारकडे कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी कुठल्याही प्रकारचे नियोजन नव्हते -
कोरोनाचा 21 दिवसांत खत्मा करण्याचा पंतप्रधानांचा दावा सफशेल फसला. सरकारकडे लॉकडाउनसंदर्भात कुठल्याही प्रकारचा प्लॅन व्हता. सरकारकडे कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी कुठल्याही प्रकारचे नियोजन नव्हते. सातत्याने लॉकडाउन केल्याचा काहीही फायदा झाला नाही, परिणाम खराबच आले. कोरोना टेस्ट आणि पीपीई किटच्या मोर्चावरही हे सरकार फेल ठरले. अर्थव्यवस्था कोलमडली. लॉकडाउनच्या नावावर क्रूर थट्टा झाली. पीएमओकडे सर्वप्रकारची पावर आहे. त्याचा वापर कर्मचारी आणि कंपन्यांच्या सुरक्षिततेसाठी केला जावा, असे सोनिया गांधी म्हणाल्या.

CoronaVirus News: कोरोनाचा 'भयानक' परिणाम! सुकून पार 'असा' झाला 'बॉडी बिल्डर', पहा - Photo

कोरोना टेस्टिंग किटच्या आयातीतही झटका बसला. लॉकडाउनच्या काळात गरिबांना आर्थिक मदत करायला हवी, सर्वांना मोफत धान्य, स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी बसेस आणि ट्रेनची व्यवस्था करायला हवी, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.

सपा, बसपा, आप बैठकीपासून दूरच -
या बैठकीला अनेक विरोधी पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. एनसीपी अध्यक्ष शरद पवार, सीताराम येचुरी, तेजस्वी यादव, डीएमके के एमके स्टालिन आणि शिवसेनेचे संजय राउत यांनी आपापल्या पक्षांचे प्रतिनिधित्व केले. मात्र, या पैठकीपासून सपा, बसपा आणि आम आदमी पार्टीने मात्र, दूर राहणेच पसंत केले. 

योगी देणार चीनला 'दणका'; बेरोजगारांना लागणार लॉटरी?, अनेक कंपन्या 'ड्रॅगन'ला सोडून UPच्या वाटेवर

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: opposition parties meeting chaired sonia gandhi amid corona virus and amphan cyclone sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.