pakistan plane crash last words audio recording of a320 airbus pilots sna | Pakistan Plane Crash: शेवटच्या काही सेकंदांत कॉकपिटमध्ये काय घडलं, 'हे' होते पायलटचे शेवटचे शब्द

Pakistan Plane Crash: शेवटच्या काही सेकंदांत कॉकपिटमध्ये काय घडलं, 'हे' होते पायलटचे शेवटचे शब्द

ठळक मुद्देलाहोरहून कराचीला जात होते हे विमान.ज्या ठिकाणी विमान कोसळले, तो दाट वस्तीचा भागअपघात स्थळी रुग्णवाहिकांनाही आत जाण्यात समस्या येत आहेत. येथे अग्निशामक दलाच्या गाड्यांनाही जाणे अशक्य होत आहे.

कराची :पाकिस्तानात आज (शुक्रवारी) मोठा विमानअपघात झाला. लाहोरहून कराचीला जाणारे हे विमानपाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे (पीआईए) होते. मिळालेल्या  प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला. यासंदर्भात माहिती देताना, अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याचे पाकिस्तान एअरलाइन्सचे सीईओ अरशद मलिक यांनी म्हटले आहे.

मलिक म्हणाले, कराचीत लँड होण्यापूर्वी पायलटने म्हटले होते, की विमानात तांत्रिक खराबी जाणवत आहे. त्यांना सांगण्यात आले होते, की कराचीमध्ये दोन रनवे  लँडिंगसाठी तयार आहेत. मात्र, त्यांना विमान उडवणेच योग्य वाटले.

लाहोरहून कराचीला जाणाऱ्या पाकिस्तान एअरलाईन्सच्या विमानाला भीषण अपघात

पीआयएचे हे विमान कॅप्टन सज्जाद गुल उडवत होते. पाकिस्तानातील माध्यमांनी दिलेल्या माहिती नुसार, विमान उतरण्याच्या बरोबर 10 मिनिटे आधी, विमानात तांत्रिक समस्या असल्याचे पायलटने सांगितले होते. यादरम्यान, एअर ट्राफिक कंट्रोल आणि पायलट यांच्याती अखेरच्या संभाषणाची रेकॉर्डिंगदेखील समोर आली आहे. एअरबस ए320च्या पायलटचे रेकॉर्ड झालेले अखेरचे शब्द "विमानाचे इंजिन काम करत नाही," असे होते.

CoronaVirus News: कोरोनाचा 'भयानक' परिणाम! सुकून पार 'असा' झाला 'बॉडी बिल्डर', पहा - Photo

अपघाताच्या बरोबर 10 मिनिटे आधीच पायलटचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला होता. कराची एअरपोर्टवर लँडिंगपूर्वी पायलट म्हणाला, 2 राउंड घेतल्यानंतर लँडिंग करू. मात्र, यानंतर विमानाला अपघात झाला. अपघातापूर्वी पायलटने लँडिंग गिअर ओपन करण्याचाही प्रयत्न केला. मात्र ते ओपन होऊ शकले नाही. पाकिस्तानातील एका वृत्तानुसार, पायलटची लँडिंग करण्याची इच्छा होती. मात्र, व्हिल ओपन हेत नव्हते. त्यामुळे त्याला काही वेळ विमान वरच उडवत रहावे, असे सांगण्यात आले होते. मात्र, याच दरम्यान ते क्रॅश झाले.

काहीसा असा आहे वैमानिकाचा अखेरचा संवाद -

पायलट: PK 8303 पोहोचत आहे.

ATC: हो सर.

पायलट: अम्हाला डाविकडे वळायचे आहे?

ATC: हो

पायलट: आम्ही सरळ उतरत आहोत, आपले दोन्ही इंजिन निकामी झाले आहेत.

ATC: कन्फर्म करा, आपण बेली लँडिंग करत आहात का? (लँडिंग गिअरच्या शिवाय)

पायलट: (काहीही सांगता येत नाही)

ATC: 2 5वर लँड करण्यासाठी रनवे तयार आहे.

पायलट: रॉजर

पायलट: सर Mayday, Mayday, Mayday, Pakistan 8303

ATC: Pakistan 8303, रॉजर सर, दोन्हीही रनवे लँडिंगसाठी तयार आहेत.

यानंतर ऑडियो कट होतो.

चीनची धमकी! आता अमेरिकेने परिणाम भोगायला तयार रहावे

माध्यमांत आलेल्या वृत्तांनुसार हे विमान एका इमारतीला धडकल्यानंतर खाली पडले. हे विमान जेथे कोसळले तो अत्यंत दाट वस्तीचा भाग आहे. येथे रुग्णवाहिकांनाही आत जाण्यात समस्या येत आहेत. येथे अग्निशामक दलाच्या गाड्यांनाही जाणे अशक्य होत आहे. विमान कोसळल्यानंतर अनेक गाड्यांनाही आग लागली आहे.

English summary :
Pakistan plane crash last words audio recording of a320 airbus pilots Lahore to Karachi.

Web Title: pakistan plane crash last words audio recording of a320 airbus pilots sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.