लाहोरहून कराचीला जाणाऱ्या पाकिस्तान एअरलाईन्सच्या विमानाला भीषण अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 04:05 PM2020-05-22T16:05:37+5:302020-05-22T16:13:56+5:30

कराची विमानतळाजवळील रहिवाशी भागात विमान कोसळलं

Pakistan International Airlines Plane Crashed Near Karachi Airport kkg | लाहोरहून कराचीला जाणाऱ्या पाकिस्तान एअरलाईन्सच्या विमानाला भीषण अपघात

लाहोरहून कराचीला जाणाऱ्या पाकिस्तान एअरलाईन्सच्या विमानाला भीषण अपघात

Next

कराची: पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे. लाहोरहून कराचीला जाणारं विमान कराची विमानतळावर उतरण्याच्या आधी अपघातग्रस्त झालं. विमानतळाजवळ असणाऱ्या रहिवाशी भागात विमान कोसळलं. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे प्रवक्ते अब्दुल सत्तार यांनी विमानाला अपघात झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. या विमानात ९० जण असल्याची माहिती मिळत आहे. मात्र जीवितहानीबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. 




पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमानाला झालेला अपघात अतिशय भीषण असल्याचं म्हटलं. या अपघातामधून कदाचित कोणीही वाचू शकणार नाही, अशी भीती प्राधिकरणानं व्यक्त केली. या अपघातामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. विमानाचे लँडिग गियर सुरू न झाल्यानं अपघात झाल्याची माहिती काही स्थानिक माध्यमांनी दिली आहे. 

विमानाच्या लँडिंगच्या मिनिटभर आधी अपघात झाल्याचं पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. या विमानात जवळपास ९० प्रवासी आणि कर्मचारी होते. विमान कोसळताच त्यानं पेट घेतला. यामध्ये विमानतळाशेजारील मॉडेल टाऊन परिसरातील ४-५ घरं जळून खाक झाली. या भागातील काही गाड्यांचंदेखील मोठ नुकसान झालं. सध्या अपघातस्थळी बचावकार्य सुरू झालं असून रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. या अपघातात विमानामधल्या प्रवाशांसोबतच मॉडेल टाऊन परिसरातल्या काही जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. 

पंतप्रधान मोदींकडून केवळ 1 हजार कोटींची मदत जाहीर; ममता बॅनर्जींची टीका

"केंद्राने ४६८ कोटी दिले, पण ठाकरे सरकार एक दमडीचंही पॅकेज द्यायला तयार नाही"

भाजपाच्या आंदोलनाला एकनाथ खडसेंनी असा दिला प्रतिसाद....

Read in English

Web Title: Pakistan International Airlines Plane Crashed Near Karachi Airport kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.