भाजपाची काँग्रेस विरोधात निदर्शने

By Admin | Updated: May 31, 2016 05:58 IST2016-05-31T05:58:05+5:302016-05-31T05:58:05+5:30

बाटला हाउस चकमक मुद्द्यावर दिलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी माफी मागावी, या मागणीसाठी भाजपा कार्यकर्त्यांनी सोमवारी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयासमोर निदर्शने केली.

Opposition against BJP's Congress | भाजपाची काँग्रेस विरोधात निदर्शने

भाजपाची काँग्रेस विरोधात निदर्शने

नवी दिल्ली : बाटला हाउस चकमक मुद्द्यावर दिलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी माफी मागावी, या मागणीसाठी भाजपा कार्यकर्त्यांनी सोमवारी नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयासमोर निदर्शने केली.
‘बाटला चकमकीत मारले गेलेल्या दहशतवाद्यांचा आयएसशीदेखील संबंध होता, हे नुकतेच उघड झाल्याने काँग्रेस अध्यक्ष व अन्य नेत्यांनी राष्ट्राची माफी मागायला पाहिजे,’ असे दिल्ली प्रदेश भाजपा अध्यक्ष सतीश उपाध्याय म्हणाले. या निदर्शनात रमेश बिधुडी, उदित राज, मीनाक्षी लेखी आणि विजय गोयल या खासदारांनीही भाग घेतला. पोलिसांचे कठडे तोडून काँग्रेस मुख्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आले.

Web Title: Opposition against BJP's Congress