शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
13
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
14
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
15
‘डोंट यू अंडरस्टँड? गेट आउट फ्रॉम हिअर!’ रस्ता मोकळा करा! ‘जेन-झी’ने हातात घेतलेले नवे शस्त्र
16
‘अमेरिकन ड्रीम’चा पोपट मेला असे म्हणायचे का?; भारताला बसणार सर्वाधिक फटका, कारण...
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 13:02 IST

Operation Sindoor : शनिवारी (१० मे २०२५) जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथे पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात सुरेंद्र कुमार यांना हौतात्म्य आले.

पहलगाम दहशतनादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध चालवलेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशासाठी हौतात्म्य आलेल्या सुरेंद्र कुमार यांचे पार्थिव रविवारी राजस्थानातील झुंझुनू येथील मेहरादासी गावात अंतिम निरोपासाठी आणण्यात आले होते. तेव्हा त्यांची पत्नी मोठ मोठ्याने रडत होती. त्यांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. यावेळी 'सुरेंद्र कुमार अमर रहें', 'सुरेंद्र कुमार जिंदाबाद' अशा घोषणा सुरू असतानाच त्यांनी लटलटत्या हाताने आपल्या हुतात्मा पतीला सॅल्यूट केला. यावेळी आक्रोश करत त्या मोठ्याने ओरडल्या, 'आय लव्ह यू यार...प्लीज उठ जा.'  यासंदर्भातला त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

सात वर्षांचा मुलगा दक्ष, याने दिला मुखाग्नी -सुरेंद्र कुमार हे ३९ विंड एअर बेसवर मेडिकल असिस्टंट सार्जंट म्हणून तैनात होते. शनिवारी (१० मे २०२५) जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथे पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात सुरेंद्र कुमार यांना हौतात्म्य आले. त्यांचे पार्थिव रविवारी अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या गावी मेहरादासी येथे आणण्यात आले होते, येथे त्यांचा सात वर्षांचा मुलगा दक्ष, याने त्यांना मुखाग्नी दिला.

हुतात्मा सुरेंद्र कुमार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक मोठ्या नेत्यांची उपस्थिती -हुतात्मा सुरेंद्र कुमार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक मोठे नेते उपस्थित होते. यात राजस्थानचे उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा, कॅबिनेट मंत्री अविनाश गलता, मंत्री कर्नल राज्यवर्धन राठौड उपस्थित होते. आपण सुरेंद्र कुमार यांच्या कुटुंबासोबत उभे आहोत, असा विश्वास राज्य सरकारने दिला. यावेळी सुरेंद्र कुमार यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदतही करण्यात आली. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरMartyrशहीदSoldierसैनिकIndian Armyभारतीय जवान