शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

कांदे-बटाटे जीवनावश्यक

By admin | Updated: July 3, 2014 08:52 IST

बेसुमार साठेबाजी आणि काळाबाजार याला वेसण घालण्यासाठी तसेच कांदा आणि बटाटा सर्वसामान्यांना रास्त दरात मुबलक उपलब्ध

नवी दिल्ली : बेसुमार साठेबाजी आणि काळाबाजार याला वेसण घालण्यासाठी तसेच कांदा आणि बटाटा सर्वसामान्यांना रास्त दरात मुबलक उपलब्ध व्हावा, यासाठी केंद्र सरकारने बुधवारी या दोहोंचा एक वर्षासाठी जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश केला. त्यामुळे बहुसंख्य जनतेच्या दैनंदिन आहाराचा अविभाज्य भाग असलेले कांदे-बटाटे जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या कक्षेत आले आहेत. परिणामी कांदे-बटाट्यांच्या साठेबाजीवर तसेच किमतीवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आर्थिक बाबींविषयक मंत्रिमंडळ समितीच्या (सीसीईए) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गरिबांना दिलासा देण्याच्या उद्देशाने सार्वजनिक वितरणप्रणालीमार्फत (स्वस्त धान्य दुकान) अतिरिक्त ५० लक्ष टन तांदूळ जारी करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.कांदा व बटाट्याचा किती साठा करावा, हे राज्य सरकारे आपापल्या राज्यातील परिस्थितीनुसार ठरवतील. राज्याने ठरवलेल्या निर्धारित मर्यादेपेक्षा कोणालाही जास्त प्रमाणात कांदा व बटाट्याचा साठा करून ठेवता येणार नाही. कांदा व बटाटा जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५च्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतानाच साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे अधिकार राज्य सरकारांना दिले जात आहेत, असे कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकारांना सांगितले.