एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला रस्त्यात गाठून केले २० वार

By Admin | Updated: September 20, 2016 14:59 IST2016-09-20T14:53:16+5:302016-09-20T14:59:28+5:30

दिल्लीमध्ये भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर एका शालेय शिक्षिकेची एकतर्फी प्रेमातून अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली.

One-way love has reached the teacher in the 20th century | एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला रस्त्यात गाठून केले २० वार

एकतर्फी प्रेमातून शिक्षिकेला रस्त्यात गाठून केले २० वार

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - दिल्लीमध्ये भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर एका शालेय शिक्षिकेची एकतर्फी प्रेमातून अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. हल्लेखोराने त्याच्याजवळच्या तीक्ष्ण हत्याराने या शिक्षिकेला २० वेळा भोसकले. मंगळवारी सकाळी उत्तर दिल्लीच्या बुरारी भागात ही घटना घडली. 
 
करुणा असे मृत शिक्षिकेचे नाव असून, ती शाळेच्या वाटेवर असताना आरोपी सुरेंद्र सिंह मागून आला. त्याने करुणाला खाली पाडून तिच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले तसेच तिला लाथांनी मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सुरेंद्र सिंह वर्षभरापासून करुणावर एकतर्फी प्रेम करत होता. 
 
त्याने करुणाला अनेकदा लग्नाची मागणी घातली पण करुणाने त्याला होकार द्यायला नकार दिला. त्यानंतर सुरेंद्रने अनेकदा करुणाला रस्त्यात गाठून जीवे मारण्याची धमकीही दिली. सुरेंद्रने छळ सुरु केल्यानंतर करुणाने पोलिसात तक्रार दाखल केली तिच्या कुटुंबियांनाही सुरेंद्रपासून होणा-या त्रासाची माहिती दिली. 
 
त्यानंतर पोलिसांनी सुरेंद्रला बोलवून समजही दिली. पण मंगळवारी करुणा तिच्या शाळेच्या मार्गावर असताना सुरेंद्रने तिला गाठले व तिच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. हल्ला करुन घटनास्थळावरुन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना जमावाने सुरेंद्रला पकडले व बेदम चोप दिला. सुरेंद्र आता पोलिसांच्या ताब्यात आहे. 
 

 

Web Title: One-way love has reached the teacher in the 20th century