शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
3
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांना भाजपाला इशारा
4
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
5
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
6
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
9
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
10
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
11
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
12
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
13
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
14
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
15
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
16
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
17
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
18
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
19
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
20
प्रज्ज्वलचे अश्लील व्हिडीओ कोणी लिक केले ?

Coronavirus: बिहारमध्ये कोरोनाचा शिरकाव, दोन पॉझिटिव्ह! एकाचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 1:02 PM

आरोग्य विभागाचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तो पाटणा येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत किडनीवरील उपचार घेत होता. तो मुंगेर जिल्ह्यातील रहिवासी होता

ठळक मुद्देआरोग्यमंत्री, आरोग्य सचिव आणि आरएमआरआयचे संचालक यांच्या प्रतिक्रिया भिन्न देश भरातील कोरोना बाधितांचा आकडा आता 329वर  महाराष्ट्रातही आणखी एकाचा कोरोनाने मृत्यू  

पाटणा - कोरोनाने आता बिहारमध्येही शिरकाव केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाटणा येथे राजेंद्र मेमोरियल रिसर्च इंस्टिट्यूटमध्ये (RMRI) दोन रुग्णांच्या कोरोना टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी एकाचा मृत्यू झाल्याचे समजते.

आरोग्य विभागाचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तो पाटणा येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत किडनीवरील उपचार घेत होता. तो मुंगेर जिल्ह्यातील रहिवासी होता. संजय कुमार यांनी तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचीही पुष्टी केली आहे.  मात्र, याप्रकरणात आरोग्यमंत्री, आरोग्य सचिव आणि आरएमआरआयचे संचालक यांच्या प्रतिक्रिया भिन्न आहेत. 

देश भरातील कोरोना बाधितांचा आकडा आता 329वर पोहोचला आहे. यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरातील जवळपास 170 हून अधिक देशांतील 3,05,046 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 13,029 जणांचा मृत्यू झाला आहे.

रात्री उशिरापर्यंत 114 सॅम्पल्सची तपासणीपाटणा येथील आरएमआरआयचे संचालक डॉ. प्रदीप दास यांनी सांगितल्यानुसार, रात्री उशिरापर्यंत केलेल्या तपासणीत कोरोनाचे दोन रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यादरम्यान एकूण 114 नमुने तपासले गेले. यासंदर्भात दिल्‍लीतील आयसीएमआर, राज्याचे आरोग्यमंत्री आणि मुख्य सचिवांना यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. 

राज्याचे आरोग्यमंत्री मंगल पांडेय यांनी, आरोग्य सचिव आणि आरएमआरआयचे संचालक यांच्या पेक्षा काहीशी वेगळी माहिती दिली आहे. त्यांनी बिहारमधील कोरोनासंदर्भात अद्याप याची पुष्टी झालेली नसल्याचे म्हटले आहे. 

देशभरात 23 जण ठणठणीत होऊन घरी परतले

देशभरात आतापर्यंत 329 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यापैकी 300 जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 23 जण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. 

महाराष्ट्रात आणखी एकाचा मृत्यू - कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी गेला आहे. 63 वर्षीय व्यक्तीचा मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. 19 मार्चला त्या व्यक्तीला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले. देशातील हा कोरोनाने दगावलेला पाचवा बळी आहे. 

राज्यात कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्याही 74 झाली असून, दिवसभरात 10 नवे रुग्ण आढळले आहेत. शनिवारी राज्यात कोरोनाचे पुण्यात 2, मुंबईत 8, यवतमाळ व कल्याणमध्ये प्रत्येकी 1 असे 12 नवे  रुग्ण आढळले होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBiharबिहारMaharashtraमहाराष्ट्रdoctorडॉक्टरIndiaभारत