शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

एक देश एक निवडणूक; JPC साठी काँग्रेसकडून प्रियंका गांधींसह या चार नेत्यांची नावे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 16:19 IST

One Nation One Election : केंद्र सरकारने 'एक देश एक निवडणूक' विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवले आहे.

One Nation One Election : केंद्र सरकारने बहुचर्चित 'एक देश-एक निवडणूक' विधेयक काल(दि.17) संसदेत मांडले. या विधेयकावरुन संसदेत बराच गदारोळ झाला. इंडिया आघाडीने या विधेयकाचा विरोध केला आहे. दरम्यान, सरकारने हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे (JPC) कडे पाठवले आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला जेपीसीची स्थापना करतील. या जेपीसाठी काँग्रेसने आपल्या चार नेत्यांची नावे निश्चित केली आहेत. ही नावे लवकरच लोकसभा अध्यक्षांकडे पाठवली जातील.

राज्यसभा आणि लोकसभा सदस्यांना एकत्र करुन संयुक्त संसदीय समितीची स्थापना केली जाते. ही समिती कोणत्याही मुद्द्याचा किंवा विधेयकाचा पूर्ण आढावा घेते आणि अहवाल तयार करते. त्यानंतरच तो शासनाकडे पाठविला जातो.

काँग्रेसची 4 नावे ठरलीमीडिया रिपोर्ट्सनुसार, काँग्रेसकडून मनीष तिवारी, प्रियंका गांधी, सुखदेव भगत आणि रणदीप सुरजेवाला यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. पक्ष आपल्या कोट्यातून ही नावे जेपीसीकडे पाठवेल. म्हणजेच हे चार नेते वन नेशन-वन इलेक्शनवर जेपीसीमध्ये काँग्रेसचा मुद्दा मांडतील. 

इंडिया आघाडीतून कोणते नेते जाणार?डीएमकेकडून पी विल्सन यांना जेपीसीमध्ये संधी मिळू शकते. विल्सन हे प्रसिद्ध वकील आहेत. विल्सन व्यतिरिक्त द्रमुक खासदार टी सेल्वागेथी यांचेही नाव जेपीसी समितीकडे पाठवू शकते. तर, सपाचे धर्मेंद्र यादव या समितीत सामील होऊ शकतात. धर्मेंद्र यादवांनी सपाच्या वतीने वन नेशन-वन इलेक्शनवर भूमिका मांडली होती. तर, कल्याण बॅनर्जी आणि साकेत गोखले टीएमसीचे प्रतिनिधित्व करतील. 

JPC मध्ये किती सदस्य असू शकतात?JPC मधील सदस्यांची संख्या लोकसभा अध्यक्ष ठरवतात. या समितीमध्ये राज्यसभा आणि लोकसभा, या दोन्ही सदस्यांचा समावेश आहे. साधारणपणे राज्यसभा सदस्यांच्या तुलनेत लोकसभेचे दुप्पट सदस्य असतात. जेपीसी अहवालाच्या आधारे सरकार सुधारित विधेयक सभागृहात मांडते. 'वन नेशन-वन इलेक्शन' विधेयक ही घटनादुरुस्ती असून, त्यासाठी सरकारला विशेष बहुमताची गरज आहे. यामुळेच सरकार जेपीसीच्या माध्यमातून यावर सहमती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

टॅग्स :One Nation One Electionवन नेशन वन इलेक्शनPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा