शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘एक निवडणूक’मुळे संसाधनांचा नीट वापर; राष्ट्रपतींचा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 08:22 IST

. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी देशाला दिलेल्या संदेशात हे वक्तव्य केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : एक राष्ट्र, एक निवडणूक ही उत्तम संकल्पना आहे. त्यामुळे उत्तम कारभार करण्यास मदत होईल, धोरण अंमलबजावणीतील शिथिलता टाळता येईल, विखुरलेल्या संसाधनांचे एकत्रीकरण होऊन त्यांचा नीट वापर होऊ शकेल, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी देशाला दिलेल्या संदेशात हे वक्तव्य केले.

मुर्मू यांनी म्हटले आहे की, ब्रिटिश राजवटीत बनविलेले कायदे रद्द करून तीन नवे व आधुनिक स्वरूपाचे कायदे लागू करण्यात आले आहेत. जुने कायदे वसाहतवादी मानसिकतेचे प्रतीक होते. ते दूर होणे आवश्यक आहे. त्यामुळेच भारतीय परंपरेला साजेसे नवीन कायदे लागू करण्याचा विचार केंद्र सरकारने केला. तसेच एक राष्ट्र, एक निवडणूक ही संकल्पनाही तितकीच महत्त्वाची आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात आल्यास देशावर कमी आर्थिक ताण येईल. राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, भारताचे संविधान अतिशय महत्त्वाचे आहे. त्यातील तरतुदींमुळे भारताच्या विकासाला चालना मिळाली. भारतीय संविधान बनविण्याच्या समितीत १५ महिला सदस्यांचा सहभाग होता. त्यांनी राज्यघटना निर्मितीमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. जगातील इतर देशांत महिलांना समान दर्जा देण्याबाबत नकारात्मक वातावरण होते. मात्र भारतात महिलांनी देशाचे भवितव्य प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी भारतातील लोकशाही व्यवस्थेला आकार दिला.

‘शेतकरी, कामगारांच्या योगदानामुळे अर्थव्यवस्था प्रभावी’राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले की, शेतकरी, कामगारांच्या योगदानामुळे भारतीय अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर प्रभावी ठरली आहे. आर्थिक विकासामुळे रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी सरकारने काही योजना राबविल्या आहेत. सर्वसमावेशक धोरणे राबविणारा व नैतिकतेच्या पायावर उभा असलेला भारत निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी संविधान महत्त्वाचे आहे, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मू