सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 17:47 IST2025-11-02T17:46:52+5:302025-11-02T17:47:28+5:30
Jharkhand News: झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील माझियाओ अंचल येथील सीओ पदावर असलेल्या एका अधिकाऱ्याला त्याच्या पत्नीने सरकारी निवासस्थानातच प्रेयसीसोबत रंगेहात पकडल्याची आणि नंतर तिथेच कोंडून ठेवल्याची अजब घटना समोर आली आहे.

सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर...
झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील माझियाओ अंचल येथील सीओ पदावर असलेल्या एका अधिकाऱ्याला त्याच्या पत्नीने सरकारी निवासस्थानातच प्रेयसीसोबत रंगेहात पकडल्याची आणि नंतर तिथेच कोंडून ठेवल्याची अजब घटना समोर आली आहे. घरात अडकलेला हा अधिकारी घराबाहेर काढण्यासाठी पत्नीला वारंवार विनवणी करत होता, पण पत्नीने दरवाजा उडण्यास साफ नकार दिला. त्यामुळे वैतागलेला हा अधिकारी शेवटी छतावकरून खाली आला आणि वाद घालू लागला. दरम्यान, प्रकरण बड्या सरकारी अधिकाऱ्याशी संबंधित असल्याने सरकारी अधिकारी आणि पोलीसही तिथे दाखल झाले. शेवटी या अधिकाऱ्याच्या प्रेयसीला पोलिसांच्या हवाली करण्यात आले.
या प्रकणाबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार गढवा जिल्ह्यातील माझियाओ अंचल येथील सीओ प्रमोद कुमार हे त्यांच्या प्रेयसीसोबत एकाच रूममध्ये झोपले होते. याची खबर त्यांची पत्नी डॉ. श्यामा राणी यांना मिळाली. त्यानंतर पहाटे ४ वाजताच त्या तिथे पोहोचल्या. तसेच कुंपण ओलांडून आत गेल्या. तेव्हा सीओ साहेब त्यांच्या प्रेयसीसोबत झोपले होते. मग पत्नीने हळूच घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली.
त्यानंतर हे अधिकारी महोदर दरवाजा उघडण्यासाठी पत्नीला वारंवार विनवणी करत होते. मात्र पत्नीने दरवाजा काही उघडला नाही. हे प्रकरण शासकीय निवासस्थानामध्ये घडल्याने तिथे पोलीसही दाखल झाले. मात्र संतप्त झालेल्या पत्नीसमोर कुणाचीच मात्रा चालली नाही. अखेरीस सदर सरकारी अधिकारी घराच्या छडावरून उडी मारून बाहेर आला. त्यानंतर त्याने पत्नीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. शेवटी पोलिसांनी या अधिकाऱ्याच्या प्रेयसीला ताब्यात घेत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सदर सरकारी अधिकाऱ्याच्या पत्नीने सांगितले की, ‘’माझ्या यांच्यावर खूप आधीपासून संशय होता. मात्र आज त्यांना रंगेहात पकडले. आता आम्ही या प्रकरणी कायदेशीर मदत घेणार आहोत’’. सदर अधिकाऱ्याची पत्नी ही बिहारचे माजी खासदार श्रीराम मांझी यांची मुलगी असल्याची माहिती समोर येत आहे.