शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वानरसेनेमुळे ओबामांच्या सुरक्षेत बाधेचे रामायण

By admin | Updated: January 22, 2015 03:23 IST

वानरसेनेच्या मुक्त संचारामुळे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या दिल्ली भेटीच्या सुरक्षेवरून रामायण घडण्याची चिन्हे आहेत.

नितीन अग्रवाल - नवी दिल्लीदेशभरातील राजकीय हालचालींचा केंद्रबिंदू असलेल्या राजधानीतील ल्युटन नावाने परिचित असलेल्या भागातील वानरसेनेच्या मुक्त संचारामुळे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या दिल्ली भेटीच्या सुरक्षेवरून रामायण घडण्याची चिन्हे आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनानिमित्त आयोजित केलेल्या ओबामांच्या भेटीसाठी अमाप खर्च करून विविध स्तरीय कडेकोट सुरक्षाकडे तयार करण्यात आले असले, तरी दिल्लीतील माकडे आणि बेवारस कुत्रे त्याला सुरुंग लावूू पाहात आहेत. लंगूरचा आवाज काढण्यासाठी माणसे लागली कामी१नवी दिल्ली महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या माकडांना आणखी थोड्या मोठ्या असलेल्या लंगूर वानरांची भीती वाटते. २म्हणूनच वानरसेनेच्या उत्पातापासून बचाव व त्यांच्या या दहशतीला आळा घालण्यासाठी लंगुरांचा वापर केला जातो. त्यासाठी वन विभागाचे सहकार्य घेण्यात येते. ३या माकडांना पळविण्यासाठी लंगूर जातीच्या माकडांचा आवाज काढण्याचे काम तूर्तास ४० जणांवर सोपविण्यात आले आहे. अनेकांना काम देण्यात आले आहे. असे ल्युटन झोनमध्ये सुमारे ४० जण कामाला लागले आहेत.जिथे ओबामांचा मुक्काम तिथेही धुमाकूळओबामांचा मुक्काम मौर्य शेरटेन हॉटेलमध्ये असेल. या हॉटेलजवळ जंगलवजा दाट झाडीचा परिसर असून, तेथे अनेक वानरे दिवसभर धुमाकूळ घालत असतात. ल्युटन झोन, विजयपथ आणि राष्ट्रपती भवनच्या पट्ट्यातील रायसीना हिल्स भागातील ही माकडांची दहशत काही नवी बाब नाही. गृह मंत्रालयासह अनेक महत्त्वाची मंत्रालये असलेल्या नॉर्थ ब्लॉक परिसरात माकडांनी मांडलेल्या उच्छादाच्या अनेक कहाण्या सर्वश्रुत आहेत. बेवारस कुत्र्यांनाही रोखायचे कसे ?सरकारी आकड्यांनुसार दिल्लीच्या रस्त्यांवर सुमारे साडेतीन लाख बेवारस कुत्र्यांचे वास्तव्य आहे. या कुत्र्यांची संख्या आणि त्रास आटोक्यात ठेवण्याचा भाग म्हणून गेल्या वर्षभरात २८ हजार बेवारस कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव डी़ एम़ सपोलिया यांनी वन, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला कामाला लावत भटक्या जनावरांच्या बंदोबस्तासाठी कृती योजना तयार करण्याचा आदेश दिला आहे.४,००० जवानांची सुरक्षाओबामा व त्यांच्या कुटुंबीयांच्या आग्रा व ताजमहाल भेटीदरम्यान त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळण्यास भारताचे चार हजार व अमेरिकेचे १०० जवान तैनात केले जाणार आहेत.