शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

आता पाकिस्तानला बनावट नोटा छापणे अशक्य..!

By admin | Updated: November 10, 2016 09:17 IST

पाकिस्तान आणि अन्य गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आंतरराष्ट्रीय गटांसाठी आता भारतीय चलनातील नव्या नोटांच्या बनावट नोट छापणे अशक्य आहे

ऑनलाइन लोकतम

नवी दिल्ली, दि. 10 - पाकिस्तान आणि अन्य गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आंतरराष्ट्रीय गटांसाठी आता भारतीय चलनातील नव्या नोटांच्या बनावट नोट छापणे अशक्य आहे, असा दावा गुप्तचर यंत्रणांनी केला आहे. एक प्रकारे गुप्तचर यंत्रणा 500 आणि 2000 रुपयांच्या नोटांच्या सुरक्षेबाबत हमी देत असल्याचे दिसत आहे. या नोटा बनवण्यासाठी जे  सुरक्षेचे उपाय अमलात आणले गेले आहेत, त्यावरुन पाकिस्तानला या नोटांच्या बनावट नोटा बनवणे कठीण असल्याचे गुप्तचर यंत्रणेचे म्हणणे आहे.
(पाकिस्तान, बांग्लादेशातील बनावट नोटांना बसणार आळा)
(मोरारजींनीही घेतला होता असा निर्णय)
(ग्राहकांची अडवणूक ; सर्वसामान्य झाले त्रस्त)
(नोटांबाबत मनातला संभ्रम दूर करण्यासाठी हे वाचा)
(चिंता नको, शनिवार, रविवारीही बँका सुरू राहणार!)
 
एका सरकारी अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, संशोधन आणि विश्लेषण विंग, गुप्तचर विभाग आणि डीआरआय गेल्या 6 महिन्यांपासून छापण्यात येणा-या नोटांची गुप्तपणे चौकशी करत आहेत. मात्र, या नोटांवर किती प्रमाणात सिक्युरिटी फीचर्स उपलब्ध आहेत, याबाबची माहिती देण्यास या अधिका-याने नकार दिला आहे. पण, नव्या नोटांच्या बनावट नोटा बनवणे अशक्य असल्याचेही त्यांनी सांगितले. 
 
पाकिस्तानातील पेशावरमध्ये एक खास कारखाना आहे, ज्यामध्ये केवळ बनावट भारतीय मुद्रा छापल्या जातात, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी सरकार आणि रिझर्व्ह बँकेला दिली होती. या कारखान्यात 500 आणि 1000 रुपयांच्या सर्वाधिक बनावट नोटा छापल्या जातात. या  कारखान्यातील काम पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या देखरेखीखाली चालत असल्याची माहिती आहे. आयएसआय दाऊद इब्राहिम, लष्कर-ए-तोयबा आणि अन्य आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गटांना आपल्या नेटवर्कद्वारे या बनावट नोटा भारतात पोहोचवते, अशी माहितीदेखील समोर आली आहे.