शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

आता आणखी एक पक्ष भाजपाची साथ सोडणार; काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीत प्रवेश करणार

By बाळकृष्ण परब | Updated: October 25, 2020 06:47 IST

BJP News : भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला गेल्या काही दिवसांपासून लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही आहे.

नवी दिल्ली - भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला गेल्या काही दिवसांपासून लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आधी शिवसेना, नंतर अकाली दल आणि गोरखा जनमुक्ती मोर्चानंतर आता अजून एका पक्षाने भाजपाची साथ सोडण्याची तयारी सुरू केली आहे. केरळमधीलकेरळ काँग्रेस (पी. सी. थॉमस गट) ने रविवारी एनडीएला अधिकृतरीत्या सोडचिठ्ठी देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.केरळ काँग्रेसचे नेचे पीसी थॉमस यांनी सांगितले की, रविवारी एनडीए सोडण्याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल. एनडीएने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आम्हाला कुठलीही जागा देण्यात आली नाही. आमच्याकडे एनडीए सोडण्याशिवाय  अन्य कुठलाही मार्ग उरलेला नाही. आम्ही रविवारी त्याबाबत अधिकृत घोषणा करू. काँग्रेसचे नेते रमेश चेन्निथला यांनी यूडीएफमध्ये आमचे स्वागत केले आहे. आम्ही उद्या आपल्या निर्णयाची घोषणा करू.यापूर्वी बुधवारी पश्चिम बंगालमधील गोरखा जनमुक्ती मोर्चाने एनडीएपासून फारकत घेण्याची घोषणा केली होती. दार्जिलिंगमध्ये वेगळ्या राज्यासाठी झालेल्या आंदोलनापासून फरार असलेले गोरखा जनमुक्ती मोर्चाचे प्रमुख बिमल गुरुंग यांनी याबाबतची घोषणा केली होती. केंद्र सरकार या पर्वतीय क्षेत्रासाठी कायमस्वरूपी राजकीय समाधान शोधण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला होता.तत्पूर्वी केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांमुळे नाराज झालेल्या शिरोमणी अकाली दलाने एनडीएतून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. तसेच मोदी सरकारमध्ये मंत्री असलेल्या अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनीही मंत्रिपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. तत्पूर्वी महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदावरून झालेल्या तिढ्यानंतर शिवसेनेने भाजपाशी असलेली मैत्री तोडली होती.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाKeralaकेरळ