‘आता धडक दिल्लीतच मारणार’

By Admin | Updated: April 1, 2016 01:02 IST2016-04-01T01:02:23+5:302016-04-01T01:02:23+5:30

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. संसदेत स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा जोरदार पुरस्कार ‘आप’चे खासदार करतील

'Now it will hit Delhi soon' | ‘आता धडक दिल्लीतच मारणार’

‘आता धडक दिल्लीतच मारणार’

- सुरेश भटेवरा,  नवी दिल्ली
स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. संसदेत स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा जोरदार पुरस्कार ‘आप’चे खासदार करतील, असे आश्वासनही त्यांनी दिले. त्याचबरोबर दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा, या मागणीला विदर्भवासीयांनीही पाठिंबा दिला आहे. दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी केजरीवालांची भेट झाल्यानंतर राज्याचे माजी अ‍ॅडव्होकेट जनरल श्रीहरी अणे यांनी खास मुलाखतीत ही माहिती दिली.
भारतीय जनता पक्षाने छोट्या राज्यांच्या मागणीचा कायम पुरस्कार केला. तथापि, सत्तेवर आल्यानंतर तमाम विदर्भवासीयांचा भाजपने विश्वासघातच केला आहे.

Web Title: 'Now it will hit Delhi soon'