शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

500 आणि 1000च्या जुन्या नोटा न घेतल्यानं आरबीआय व केंद्राला नोटीस

By admin | Updated: March 21, 2017 16:38 IST

जुन्या नोटा बँकेत स्वीकारल्या जात नसल्याबद्दल शरद मिश्रा नावाच्या एका व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली

नवी दिल्ली, दि. 21 - मोदी सरकारनं 8 नोव्हेंबर 2016ला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर चलनातून रद्द करण्यात आलेल्या नोटा 31 मार्च 2017पर्यंत बँकेत जमा करता येतील, अशी मुदतही देण्यात आली होती. मात्र, आता जुन्या नोटा बँकेत स्वीकारल्या जात नसल्याबद्दल शरद मिश्रा नावाच्या एका व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने या प्रकरणी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे.मोदींनी मागील वर्षी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी जुन्या नोटा 31 मार्च 2017पर्यंत जमा करता येऊ शकतील, असेही सांगितले होते, असा दावा याचिकाकर्त्याने कोर्टात केला आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जगदीशसिंह खेहर यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. याचिकाकर्ता जुन्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी गेला असताना नोटा का जमा करून घेतल्या नाहीत, अशी विचारणा नोटिशीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला करण्यात आली आहे. कोर्टानं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकारला दोन आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितलं आहे. त्यानंतर 11 एप्रिल रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार असून, हे प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यात येणार असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. या प्रकरणावर कोणतेही लेखी उत्तर देण्यापेक्षा प्रत्यक्ष म्हणणे मांडण्याचा सल्ला कोर्टानं केंद्राला दिला आहे.