शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद
2
पुश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
3
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
4
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
5
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
6
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
7
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
8
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
9
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
10
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
11
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
12
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
13
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
14
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
15
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
16
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
17
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
18
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
19
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
20
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्यक शिक्षण संस्थांना लागू नाही शिक्षण हक्क कायदा

By admin | Updated: December 18, 2014 22:39 IST

जनहित याचिका : हायकोर्टाची राज्य शासनाला नोटीस

जनहित याचिका : हायकोर्टाची राज्य शासनाला नोटीस
नागपूर : अल्पसंख्यक शिक्षण संस्थांना शिक्षण हक्क कायदा लागू नसल्याचा दावा करणारी जनहित याचिका यवतमाळ येथील ऊर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक कल्याण संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे.
२० नोव्हेंबर २०१३ रोजीच्या शासन निर्णयानुसार इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळांना शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. याअंतर्गत यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी २८ ऑक्टोबर २०१४ रोजी जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीचे निर्देश देऊन शिक्षकांची संख्या कळविण्यास सांगितले आहे. शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षण सेवकांना नोकरीतून कमी करण्यात येते, तर स्थायी शिक्षकांना इतरत्र सामावून घेण्यात येते. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यीय घटनापीठाने अनुदानित व विनाअनुदानित या दोन्ही प्रकारच्या अल्पसंख्यक शिक्षण संस्थांना शिक्षण हक्क कायदा लागू होत नसल्याचा निर्णय दिला असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
-------------------------
चौकट...
शासन निर्णयावर स्थगनादेश
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी याप्रकरणी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, प्राथमिक शिक्षण संचालक व यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांना नोटीस बजावून उत्तर सादर करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ दिला आहे. तेव्हापर्यंत १२ नोव्हेंबर २०१३ रोजीचा शासन निर्णय व २८ ऑक्टोबर २०१४ रोजीच्या यवतमाळ जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्रावर स्थगनादेश दिला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. फिरदोस मिर्झा व ॲड. अश्फाक शेख यांनी कामकाज पाहिले.