शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अबब! शे, बाराशे नाही तर तब्बल ४ कोटी; भलं मोठं वीज बिल पाहून बसेल ४४० व्होल्टचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 16:54 IST

एका ग्राहकाला जुलैमध्ये ४ कोटी २ लाख रुपयांचं वीज बिल पाठवलं. फोनवर वीज बिलाचा मेसेज पाहून ग्राहक हैराण झाला.

नोएडामध्ये एका सर्वसामान्य ग्राहकाला तब्बल चार कोटी रुपयांचं बिल देण्यात आल्याने वीज विभागाचा मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. एवढं मोठं बिल पाहून घरमालकाला धक्काच बसला. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार या व्यक्तीने वीज विभागाकडे केली आहे. याची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली असून एका घराचं बिल कोट्यवधी रुपये कसं येऊ शकतं हा प्रश्न पडला आहे. 

वीज विभागाने नोएडा येथील सेक्टर-१२२ मध्ये राहणाऱ्या एका ग्राहकाला जुलैमध्ये ४ कोटी २ लाख रुपयांचं वीज बिल पाठवलं. फोनवर वीज बिलाचा मेसेज पाहून ग्राहक हैराण झाला. यानंतर त्याने या संपूर्ण प्रकरणाची तक्रार वीज विभागाकडे केली. घरमालकाने सांगितले की, वीज कंपनीकडून एक एसएमएस अलर्ट मिळाला होता ज्यामध्ये त्याला कळवलं होतं की त्यांचं तीन महिन्यांचं वीज बिल – ९ एप्रिल ते १८ जुलै – ४०२३१८४२.३१ रुपये आहे आणि रक्कम जमा करण्याची अंतिम तारीख २४ जुलै देण्यात आली आहे..

मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर-१२२ च्या सी ब्लॉकमध्ये राहणारे बसंत शर्मा हा रेल्वेत काम करतो. यावेळी बसंत याच्या मोबाईलवर वीजबिलाबाबतचा संदेश आला. मात्र यावेळी वीज बिलाची रक्कम पाहून बसंत शर्मा हादरला. कारण, वीज विभागाने पाठवलेल्या बिलात बसंत शर्माला चार कोटी २ लाख रुपयांचं बिल पाठवण्यात आलं होतं.

बसंत हा प्रशिक्षणासाठी शिमला येथे गेला होता. वीज बिल पाहिल्यानंतर त्याने तात्काळ सेक्टरच्या आरडब्ल्यूए अधिकाऱ्याला माहिती दिली आणि वीज विभागाकडे तक्रार केली. वीजबिल भरण्यासाठी वीज विभागाने बसंतला २४ जुलैपर्यंत मुदत दिली होती. बसंतला दरमहा सरासरी वीज बिल १००० रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र यावेळी अचानक बिल चार कोटी रुपये आले.

विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना ही बाब समजल्यानंतर वीज बिल २८ हजार रुपये झाले. नोएडा येथील इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशनचे मुख्य अभियंता हरीश बन्सल यांनी सांगितलं की, एक प्रकरण आमच्या निदर्शनास आलं होतं, ग्राहकांचं बिल थांबवण्यात आलं होतं, परंतु त्यानंतरही त्यांच्यापर्यंत मेसेज पोहोचला, ही मानवी चूक आहे, आता बिल आलं आहे. दुरुस्त केलं आहे. सध्या नवीन बिल ग्राहकाला पाठवलं जात आहे. 

टॅग्स :electricityवीज