शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा सीमांकनात कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही : मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 11:15 IST

New Delhi News: लोकसभा आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू करण्यासाठी सुरू असलेल्या परिसीमन प्रक्रियेत राज्यांमध्ये मोठे किंवा छोटे, उत्तर किंवा दक्षिण, पूर्व किंवा पश्चिम, असा कोणताही भेदभाव केला जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ठामपणे सांगितले.

नवी दिल्ली - लोकसभा आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू करण्यासाठी सुरू असलेल्या परिसीमन प्रक्रियेत राज्यांमध्ये मोठे किंवा छोटे, उत्तर किंवा दक्षिण, पूर्व किंवा पश्चिम, असा कोणताही भेदभाव केला जाणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ठामपणे सांगितले, तसेच या सुधारणेला विरोध करणाऱ्यांना देशातील महिला माफ करणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

लोकसभेत महिला आरक्षण कायद्यात दुरुस्ती आणि परिसीमन आयोग स्थापन करण्यासंदर्भातील तीन विधेयकांवरील चर्चेत हस्तक्षेप करताना पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले की, परिसीमन प्रक्रियेमुळे कोणत्याही राज्यातील लोकसभा जागांचे प्रमाण कमी होणार नाही. त्या प्रमाणात कोणताही बदल होणार नाही आणि वाढही त्याच प्रमाणात होईल. २०२९ मध्ये महिला आरक्षण कायदा लागू करण्याचे श्रेय सरकारला मिळावे, अशी आमची इच्छा नाही आणि हवे असल्यास आम्ही ते श्रेय विरोधकांनाही देण्यास तयार आहोत. लोकसभेत महिला आरक्षण कायद्यात दुरुस्ती करणाऱ्या विधेयकावरील चर्चेदरम्यान द्रमुक सदस्यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी काळे कपडे परिधान केले होते. त्याबाबत मोदी म्हणाले की, हे काळे कपडे म्हणजे नजर लागू नये म्हणून लावण्यात येणाऱ्या काळ्या तिलकासारखे काम करतील. या चर्चेत विरोधकांनी महिला आरक्षण बिल पूर्वीच मंजूर होते पण अंमलबजावणीस एवढा विलंब का असा प्रश्न उपस्थित केला. 

‘महिला आरक्षण हा राष्ट्रीय हिताचा निर्णय’मोदी यांनी सांगितले की, महिला आरक्षणाच्या निर्णयाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नका. हा राष्ट्रीय हिताचा निर्णय आहे. २०२३ मध्ये महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होत असताना घाई करू नका, असे सांगितले जात होते. २०२४ मध्ये ते शक्य झाले नाही. कारण इतक्या कमी वेळेत या गोष्टी पूर्ण करता येत नाहीत. आता २०२९ पर्यंत वेळ आहे. जर आपण तेही केले नाही, तर परिस्थिती काय असेल, याची कल्पना करा. आता अधिक विलंब न करण्याची गरज आहे. 

ओबीसी, मुस्लीम महिलांनाही आरक्षण द्या : अखिलेश यादवसमाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सांगितले की, भाजपने राजकीय फायद्यासाठी ‘नारी’ (महिला) याला ‘नारा’ (घोषवाक्य) बनवले आहे. त्यांनी प्रस्तावित महिला आरक्षण कायद्यात ओबीसी आणि मुस्लीम महिलांसाठीही आरक्षण देण्याची मागणी केली.ते म्हणाले की, भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सरकारे आहेत; पण त्यांच्याकडे फक्त एक महिला मुख्यमंत्री आहे, तीही दिल्लीमध्ये. भाजपकडे किती महिला आमदार, खासदार आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारला. 

‘संविधान दुरुस्ती बिल लोकशाहीसाठी घातक’ काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधींनी संविधान दुरुस्ती विधेयकाद्वारे लोकशाहीवर हल्ला सुरू झाल्याचा आरोप केला. सरकार विद्यमान ५४३ लोकसभा जागांवरच महिलांना ३३ टक्के आरक्षण का देत नाही? या विधेयकात  ८५० जागांचा उल्लेख २०११ च्या जनगणनेच्या आधारे परिसीमन आयोगाद्वारे केला जाणार आहे. २०२३ मध्ये महिला आरक्षण कायदा मंजुरीस काँग्रेसने पाठिंबा दिल्याचे त्या म्हणाल्या. 

‘हा तर मतदारयाद्यांतून नावे वगळण्याचा डाव’महिला आरक्षण कायद्यातील दुरुस्ती व मतदारसंघ पुनर्रचना आयोगाच्या स्थापनेशी संबंधित विधेयकांना जोडणे म्हणजे मतदार वगळण्याचा आणि ‘एनआरसी’ कायदा लागू करण्याचा कट असल्याचा आरोप प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. 

राजकीय समतोल बदलण्याचा धूर्त डाव -डावे पक्षसरकार महिलांच्या आरक्षणाला नव्या परिसीमन प्रक्रियेशी जोडून भारतातील राजकीय समतोल बदलण्याचा ‘धूर्त’ आणि ‘घातक’ प्रयत्न करीत असल्याचा आरोप डाव्या पक्षांच्या नेत्यांनी गुरुवारी केला. हा प्रस्ताव महिलांच्या आरक्षणासाठी आधीच तयार केलेल्या आराखड्यापेक्षा वेगळा आहे. या आरक्षणाचा वापर भारताचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी अन् सत्तेचे केंद्रीकरणासाठी असल्याचा आरोप डाव्यांनी केला.  

संसदेतील संख्याबळलोकसभेतील सध्याचे संख्याबळएनडीए समर्थन     २९३ खासदार (५४%)विरोधी पक्ष     २३३ खासदारअपक्ष     ७वायएसआरसीपी    ४एआयएमआयएम    १ (विरोधक)शिरोमणी अकाली दल    १लोकसभेत प्रमुख पक्षनिहाय आकडेभाजप    २४०काँग्रेस    ९८तेलुगु देसम पार्टी     १६जदयू     १२संभाव्य मतदान परिणामसमर्थन    २५१विरोध    १८५राज्यसभेतील संख्याबळएनडीए समर्थन    १४१ (५८%)विरोधी पक्ष    ८३इतर (बीआरएस. वायएसआरसीपी, बिजद, बसप, अपक्ष)    २०राज्यसभेत पक्षनिहाय आकडेभाजप    १०७काँग्रेस    २८तृणमूल काँग्रेस    १३आप    १०द्रमुक    ८

English
हिंदी सारांश
Web Title : No injustice to any state in delimitation: Modi

Web Summary : PM Modi assures fair delimitation for women's reservation, dismissing regional bias. He challenged opponents, emphasizing national interest over political gains. Opposition leaders raised concerns about OBC, Muslim inclusion, and potential political manipulation in the process.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारlok sabhaलोकसभाWomen Reservationमहिला आरक्षण