शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 12:13 IST

सोन्याची काठी गहाळ झाल्याने पोलिसांना बोलविण्यात आले होते. पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले होते.

केरळच्या ऐतिहासिक श्री पद्मनाभस्वामी मंदिरात एक चमत्कार घडला आहे. सोन्याची एक काठी गहाळ झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. आता ही कांडी रहस्यमयीरित्या मंदिराच्या भांडारातच सापडली आहे. हा सोन्याचा रॉड मंदिराच्या परिसरातच रेतीच्या खाली पुरलेला सापडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सोन्याचे दागिने ठेवलेली खोली नाही कोणी उघडली होती ना ही कोणी सीसीटीव्हीत आत-बाहेर जाताना दिसला आहे. यामुळे ही चमत्कारीक घटना मानली जात आहे. 

सोन्याची काठी गहाळ झाल्याने पोलिसांना बोलविण्यात आले होते. पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले होते. श्वान या काठीचा माग घेत रेती असलेल्या भागात आले, तिथे ती पुरलेल्या अवस्थेत सापडली. यामुळे ती कोणी ठेवली, चोरण्याचा प्रयत्न झाला का हे पाहण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज शोधले, परंतू कोणीच त्यात दिसले नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

भक्तांनी याला देवाचा चमत्कार मानले आहे. मंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाजांची दुरुस्ती सुरु होती. यावेळी दरवाजात जडलेल्या सोन्यापासून १२ सेमी लांबीचा रॉड बनविला होता. याद्वारे दरवाजावरील सोन्याच्या प्लेट वेल्ड केल्या जाणार होत्या. २७ एप्रिलला काम सुरु झाले. त्यानंतर ३० एप्रिलला काम पूर्ण झाल्यावर मंदिर प्रशासनाने सर्व सोन्याच्या वस्तू एका कापडी पिशवीत घालून स्ट्राँग रुममध्ये ठेवल्या.  ३ मे रोजी पाहिले असता त्या पिशवीतून सोन्याचा रॉड गायब झाला होता. ३० एप्रिल नंतर मधल्या काळात स्ट्राँग रुम उघडण्यात आली नव्हती. यामुळे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली, तर त्यातही कोणी आल्याचे किंवा गेल्याचे दिसले नाही. तसेच रुमचे टाळे देखील व्यवस्थित होते. 

पोलीस आता रॉड रेतीत सापडला असला तरी कारवाई करणार आहेत. तपासही केला जात आहे. मंदिराचे सोने ठेवण्याची ज्या लोकांवर जबाबदारी आहे त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यांच्यापैकीच कोणीतरी ही रॉड लंपास केली असेल व चोरी पकडली जाईल म्हणून घाबरून रेतीत पुरण्यात आली असेल असा संशय पोलिसांना आहे. तसेच  ही घटना निष्काळजीपणाची होती की नियोजित चोरीचा प्रयत्न होता हे पोलिस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

टॅग्स :GoldसोनंKeralaकेरळCrime Newsगुन्हेगारी