शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

११९पेक्षा जादा जागा नाहीच

By admin | Updated: September 22, 2014 09:46 IST

भाजपाला ११९ जागांपेक्षा एकही जागा वाढवून देऊ शकत नाही. भाजपाने आपण घेणारे आहोत देणारे नाही याचे भान राखावे अन्यथा शिवसेनेचा नाईलाज होईल.

मुंबई : भाजपाला ११९ जागांपेक्षा एकही जागा वाढवून देऊ शकत नाही. भाजपाने आपण घेणारे आहोत देणारे नाही याचे भान राखावे अन्यथा शिवसेनेचा नाईलाज होईल. शिवसेनेला कस्पटासमान लेखाल तर आमचे वाघ तयार आहेत, असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिला. तसेच याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी त्यांनी भाजपाला सोमवार दुपारपर्यंतची मुदत दिली आहे.युती राहो अथवा तुटो मी लढायला उभा आहे. तुम्ही माझ्यासोबत आहात. ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. आयुष्यातील शेवटची परीक्षा आहे. यामध्ये पास झालो तर पुन्हा आपली परीक्षा घेण्याची कुणाची हिंमत होणार नाही, असे भावनिक आवाहनही ठाकरे यांनी राज्य कार्यकारिणीत शिवसैनिकांना केले.उद्धव यांची रविवारची भाषा अत्यंत आक्रमक व तिखट होती. त्यांची देहबोली आव्हानात्मक होती. युतीबाबत ठाकरे बोलत होते, तेव्हा उपस्थित शिवसैनिक त्यांच्या जयजयकाराचे चित्कार अन् भाजपाचा धुत्कार करीत होते. राज्यातील भाजपा नेत्यांनी उकरून काढलेल्या जुन्या विषयांवर भाजपाला उत्तर देताना प्रतिभाताई पाटील व प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याचा अभिमान वाटतो, असे सांगत ठाकरे यांनी सेनेच्या भूमिकेचे समर्थन केले. शिवसेना १५१, भाजपा ११९ तर मित्रपक्षांना १८ जागा देण्याचा अंतिम फॉर्म्युला वाहिन्यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी मांडला. मित्रपक्षांना द्यायच्या सर्व जागा शिवसेना देईल. हे धोंडे शिवसेना पदरात घेईल, असे ठाकरे म्हणाले. (प्रतिनिधी)