शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही; मेहबूबा मुफ्तींच्या कन्येचं टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2019 14:20 IST

नागरिकत्व (सुधारणा) विधेयकावरुन मोदी सरकार लक्ष्य

श्रीनगर- नागरिकत्व (सुधारणा) विधेयकावरुन जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा जावेद यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही, अशा शब्दांमध्ये इल्तिजा जावेद यांनी नागरिकत्व (सुधारणा) विधेयकावरुन सरकारला लक्ष्य करत त्यांची नाराजी व्यक्त केली. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर मुफ्ती यांना ताब्यात घेण्यात आलं. तेव्हापासून त्यांची मुलगी इल्तिजा त्यांची सोशल मीडिया अकाऊंट्स सांभाळते.नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या आराखड्याला काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यानंतर काही तासांमध्ये मेहबूबा मुफ्तींच्या ट्विटरवरुन इल्तिजा यांनी ट्विट केलं. भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही, अशा शब्दांत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी मिळाल्यास बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून येणाऱ्या अल्पसंख्यांकांना भारताचं नागरिकत्व मिळवण्याची प्रक्रिया सोपी होईल. या विधेयकावर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. सरकार मुस्लिमांशी भेदभाव करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.  मेहबूबा मुफ्ती यांनी याआधीही अनेकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढल्यानंतरही त्यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं होतं. भारत सरकारचा उद्देश भयावह आहे. मुस्लिमांची संख्या जास्त असलेल्या देशातील एकमेव राज्यातील लोकसंख्येचं गणित बदलण्याचा सरकारचा मानस आहे. मुस्लिमांचे अधिकार कमी करुन त्यांना त्यांच्याच राज्यात दुय्यम वागणूक देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी टीका मुफ्ती यांनी केली होती. 

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीPDPपीडीपीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी