शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
4
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
5
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
6
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
7
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
8
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
9
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
10
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
11
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
12
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
13
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
14
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
15
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
16
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
17
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
18
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
19
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
20
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके

No Confidence Motion: केवळ एका मताने पडले होते वाजपेयी सरकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 12:37 PM

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी 2003 साली अविश्वास ठरावाला सामोरे गेले होते. खरंतर त्यांनी आपल्या पंतप्रधान कार्यकाळात दोन अविश्वास ठरावांचा सामना केला.

नवी दिल्ली- सत्तेत आल्यानंतर चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर तेही भक्कम संख्याबळ असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अविश्वास ठरावाला उद्या सामोरे जाणार आहेत. केंद्रातील भाजपाप्रणीत रालोआ सरकार या ठरावामुळे डळमळीत होणार नसले तरी सत्ताधारी आणि विरोधक या ठरावाच्या भाषणांमधून 2019 सालच्या निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फोडतील हे निश्चित.

याआधी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी 2003 साली अविश्वास ठरावाला सामोरे गेले होते. खरंतर त्यांनी आपल्या पंतप्रधान कार्यकाळात दोन अविश्वास ठरावांचा सामना केला. 2003 साली लोकसभेत अविश्वास ठरावावर भाषण करताना पंतप्रधान वाजपेयी यांनी अत्यंत भावनिक भाषण करत सरकारबद्दल लोकांच्या मनामध्ये विश्वास असल्याचे विचार व्यक्त केले होते. आता निवडणुकीच्या आदी एक वर्ष अशाच प्रकारे भाषण करण्याची नरेंद्र मोदी यांना संधी मिळाली आहे.

बहुजन समाज पक्षाचा विरोध- 1999 साली पंतप्रधान वाजपेयी यांनी सर्वात प्रथम अविश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागले. यावेळेस त्यांचे सरकार केवळ एका मताने पराभूत झाले. बहुजन समाज पक्षाने भारतीय जनता पार्टीस मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी आयत्यावेळेस भाजपा सरकाविरोधात भूमिका घेतली.  हे सरकार दलितविरोधी आहे असे सांगत या पक्षाने सरकारला विरोध केला होता.

गिरिधर गमांग आणि सैफुद्दिन सोझ- अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार कोसळण्याचे खरे कारण जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार सैफुद्दिन सोझ यांनी अचानक अविश्वास ठरावाला पाठिंबा देऊन रालोआ सरकारविरोधात मतदान केले. यामुळे त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले सोझ सध्या काँग्रेसमध्ये आहेत.  त्याहून धक्कादायक घटना लोकसभेत त्यावेळेस घडली होती ती म्हणजे गिरिधर गमांग यांनी लोकसभेत येऊन सरकारविरोधात मतदान करणे. गमांग ओडिशाचे मुख्यमंत्री होते, त्यांनी ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला होता, मात्र त्यांनी लोकसभेचे सदस्यत्व सोडले नव्हते. त्यांच्या एका मताचाही रालोआ सरकारला फटका बसला. आज हेच गमांग भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटल बिहारी वाजपेयीNo Confidence motionअविश्वास ठरावprime ministerपंतप्रधानLoksabhaलोकसभा