शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

No Confidence Motion: राजमाता विजयाराजे सिंदियांना अश्रू अनावर झाले तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 1:47 PM

1999 साली अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारला लोकसभेत 269 सदस्यांनी पाठिंबा दिला तर त्यांच्या सरकारविरोधात 270 सदस्यांनी पाठिंबा दिला होता.

नवी दिल्ली- राजकारण आणि सत्तेत कायम राहाणे या सतत बदलणाऱ्या गोष्टी आहेत. विशेषतः एखादे आघाडीचे सरकार पाच वर्षे कायम राहण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. विविध पक्षांना, विविध प्रांतातील विचारांना, नेत्यांना एकत्र घेऊन काम करणे अत्यंत कठिण काम असते. अटलबिहारी वाजपेयी यांनी आघाडीचे आव्हान स्विकारून सरकार स्थापन केले होते. मात्र 1999 मध्ये मात्र त्यांच्या सरकारला मोठ्या नामुष्कीजनक पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभेत केवळ एका मताने त्यांच्या सरकारचा पराभव झाला होता.

जयललिता यांची भूमिका-14 एप्रिल 1999 रोजी अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी रालोआ सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या मंत्र्यांना राजीनामे देण्यास सांगितले. यामुळे अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारला विरोधकांच्या  अविश्वास दर्शक ठरावाला सामोरे जावे लागले. यामध्ये बहुजन समाज पार्टीने अचानक सरकारविरोधात भूमिका घेतली. तर गिरिधर गमांग यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री असूनही मतदानाला येणे धक्कादायक होते. त्यातच नॅशनल कॉन्फरन्सच्या सैफुद्दिन सोझ यांनी रालोआ सरकारविरोधात भूमिका घेतली. त्यामुळे वाजपेयी यांचे सरकार अल्पमतात आले.

एका मताने पराभव झाल्यावर-अविश्वास दर्शक ठरावात सरकार केवळ एका मताने पराभूत झाल्यावर संपूर्ण लोकसभा काही क्षण स्तब्ध झाल्यासारखी झाली. वाजपेयी यांनी निकालाकडे एक नजर टाकून ते पीएम चेंबरच्या रुम नंबर 10 मध्ये आले. त्यांना पाहाताच राजमाता विजयाराजे सिंदिया यांना अश्रू आवरणे कठिण झाल्या आणि त्या रडू लागल्या. वाजपेयी यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळेस त्यांनाही अत्यंत दुःख झाले. आपण पराभूत झालो, केवळ एका मताने पराभूत झालो असे शब्द त्यांनी अडवाणी यांना उद्देशून उच्चारले. राजमाता सिंदिया या ग्वाल्हेर घराण्याच्या महाराणी आणि भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून प्रत्येक वाटचालीत त्यांचा सहभाग होता. भाजपाच्या प्रदीर्घ काळ उपाध्यक्षही होत्या. त्यामुळेच पक्षाचे सरकार केवळ एका मताने पराभूत होणे त्यांना सहन झाले नाही. सरकारच्या बाजूने 269 तर सरकारविरोधात 270 मते पडली होती.

निकालानंतर-पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आपल्या सरकारचे बहुमत सिद्ध करण्यात यशस्वी झालेले नाहीत असे लोकसभेचे सभापती जीएमसी बालयोगी यांनी जाहीर केले. विरोधी पक्षनेते शरद पवार यांनी बहुजन समाज पक्षाने सरकारविरोधात भूमिका घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले होते. जर समान मते पडली असती तर सभापतींना आपले निर्णायक मत देता आले असते असे मत लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केले होते.

 

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावprime ministerपंतप्रधानAtal Bihari Vajpayeeअटल बिहारी वाजपेयी