नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 15:22 IST2025-10-21T15:20:51+5:302025-10-21T15:22:31+5:30
Nitish Kumar Bihar Politics: बिहारमध्ये नोव्हेंबरला दोन टप्प्यात होणार मतदान, १४ नोव्हेंबरला लागणार निकाल

नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
Nitish Kumar Bihar Politics: बिहारमध्ये सध्या निवडणुकांचा माहोल आहे. सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. तसेच, काही नेतेमंडळी बडे दावे करतानाही दिसत आहेत. यातच बिहारचे सध्याचे मुख्यमंत्री नीतीश कुमार हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, असा दावा मोठा दावा करण्यात आला आहे. अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी नितीश कुमार यांच्याबाबत हे महत्त्वाचे विधान केले आहे.
नितीश कुमार पुन्हा CM होणार नाहीत...
निवडणुकीनंतर नितीश कुमार मुख्यमंत्री होतील का?, असे पत्रकारांनी विचारले असता त्यांनी उत्तर दिले- "अजिबात नाही..! भाजपाही त्यांचा सन्मान करणार नाही." काँग्रेस त्यांचा सन्मान करेल का?, असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर पप्पू यादव म्हणाले, "हो, नक्कीच. जर त्यांना यायचे असेल तर काँग्रेस त्यांचा आदर करेल आणि त्यांचे स्वागतही करेल."
इंडिया आघाडीतील एकतेच्या अभावाबाबतही ते बोलले. "काळजी करू नका. एनडीएचे सर्व नेते प्रचारात व्यस्त आहेत का? कोणीही नाही. चिराग पासवानचा खेळ काय चालला आहे? आपण पाहतोय. त्यामुळे महाआघाडीवर प्रश्न विचारू नका, भाजप नेत्यांना विचारा. त्यांच्यात एकता कुठे आहे? त्यांना नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावे असे वाटत आहे का? कारण सध्या बिहारमधील सर्वात मोठा प्रश्न हाच आहे."
VIDEO | Patna: Purnia MP Pappu Yadav says, "The way BJP and Chirag Paswan have isolated Nitish Kumar to maintain their strike rate, I don't think Nitish Kumar will remain in the NDA after the elections. Only Congress will give Nitish Kumar the respect he deserves."… pic.twitter.com/VNTuNrdquv
— Press Trust of India (@PTI_News) October 21, 2025
बिहार निवडणूक २०२५ दोन टप्प्यात
बिहार निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यांसाठी नामांकन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पहिल्या टप्प्यासाठी मतदान ६ नोव्हेंबर रोजी आणि दुसऱ्या टप्प्यासाठी ११ नोव्हेंबर रोजी होईल. निवडणुकीचे निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील.