शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

नितीश आणि लालू शेजारी-शेजारी

By admin | Updated: May 23, 2014 00:20 IST

निंदकाचे घर असावे शेजारी ही प्रचलित म्हण सध्या नितीश व लालू यांच्याकरिता शब्दश: सार्थ ठरणार असे दिसते आहे.

पाटणा : निंदकाचे घर असावे शेजारी ही प्रचलित म्हण सध्या नितीश व लालू यांच्याकरिता शब्दश: सार्थ ठरणार असे दिसते आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीशकुमार आपले कट्टर विरोधक लालू यांच्या शेजारी राहावयास जाणार असल्याचे वृत्त आहे. १ अणे मार्गावरील मुख्यमंत्री निवासस्थानात नऊ वर्षे राहिल्यानंतर ते सोडून नितीश कुमारांना ७ सर्क्युलर रोडवरील बंगल्यात स्थानांतरित व्हावे लागणार आहे. या बंगल्याच्या बाजूच्याच बंगल्यात राजदचे सुप्रीमो लालूप्रसाद यादव हे आपल्या पत्नीसह राहत आहेत. माजी मुख्यमंत्री या नात्याने इमारत बांधकाम विभागाने नितीशकुमारांना हा बंगला दिला असून त्यात सध्या राज्याचे मुख्य सचिव अशोक कुमार सिन्हा हे राहत आहेत. ते जूनमध्ये सेवानिवृत्त होत असून त्यांच्यानंतर नितीशकुमार तेथे राहावयास येतील. तोपर्यंत त्यांना २ स्टँडरोडवरील एक बंगला देण्यात आला आहे. लवकरच हे दोन्ही बिहारी बाबू शेजारी-शेजारी राहावयास येणार ही एक मोठी बातमी आहे. कारण जनता दलाच्या विभाजनानंतर नितीश व लालू हे परस्परांचे कट्टर विरोधक बनले होते. मात्र त्यांच्या अशा अपरिहार्य आजूबाजूला राहण्यामुळे हा नवा शेजारधर्म ते कसे सांभाळतात हे आता पहायचे. (वृत्तसंस्था)