शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
2
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
3
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
4
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
5
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
7
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
8
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
9
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
10
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
11
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
13
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
14
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
15
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
16
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
18
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...
19
स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
20
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

लुंगी, चप्पल घालून वाहन चालवल्यास होतो दंड? नितीन गडकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 10:11 AM

नवा मोटार वाहन कायदा लागू झाल्यापासून लुंगी नेसून, अर्ध्या बाह्या असलेले शर्ट घालून, चप्पल घालून गाडी चालवल्यास दंडात्मक कारवाई होत असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ठळक मुद्देनवा मोटार वाहन कायदा लागू झाल्यापासून लुंगी नेसून, अर्ध्या बाह्या असलेले शर्ट घालून, चप्पल घालून गाडी चावल्यास दंडात्मक कारवाई होत असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेतअशा मेसेजबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया समोरसोशल मीडियात पसरत असलेले असे मेसेज केवळ अफवा असल्याचे गडकरी यांनी केले स्पष्ट

नवी दिल्ली - नवा मोटार वाहन कायदा लागू झाल्यापासून लुंगी नेसून, अर्ध्या बाह्या असलेले शर्ट घालून, चप्पल घालून गाडी चालवल्यास दंडात्मक कारवाई होत असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे वाहन चालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आता अशा मेसेजबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. सोशल मीडियात पसरत असलेले असे मेसेज केवळ अफवा असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले असून, अशा अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. नितीन गडकरी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यात ते म्हणतात, ''अफवांपासून सावधान, नव्या मोटार वाहन कायद्यामध्ये अर्ध्या बाह्यांचे शर्ट घालून वाहन चालवल्यास किंवा लुंगी, बनियान घालून वाहन चालवल्यास दंड करण्याची कुठलीही तरतूद नाही. वाहनामध्ये अतिरिक्त बल्ब नसल्यास, वाहनाच्या काचा मळलेल्या असल्यास तसे चप्पल घालून वाहन चालवल्यास दंड ठोठावण्याचीही कुठलीही तरतूद नाही.'' 

नवा मोटार वाहन कायदा लागू झाल्यापासून  या कायद्याबाबत समाजातून उलट सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. हा कायदा लागू झाल्यापासून नियमभंग करणाऱ्यांकडून जबर दंड वसूल केला जात आहे. दरम्यान,  या वाहन कायद्याच्या अंमलबजावणीनंतर होत असलेल्या दंडात्मक कारवाईबाबत अफवा आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्या काही पत्रकारांवरही गडकरी यांनी टीका केली होती. प्रसारमाध्यमांमधील माझ्या काही मित्रांनी रस्ते सुरक्षेसारख्या गंभीर विषयाचा विनोद बनवला आहे, असा टोला गडकरींनी लगावला होता.  नवा मोटार वाहन कायदा 1 सप्टेंबरपासून लागू झाला असून, त्याअंतर्गत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणाऱ्या दंडाच्या रकमेत दहा टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीTrafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा