शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

नितीन गडकरी असतील पुढचे पंतप्रधान- प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 9:26 PM

भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकर यांचं भाकीत

मुंबई: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी देशाचे पुढील पंतप्रधान असतील, असं भाकीत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवलं. गडकरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुढील पंतप्रधान असतील, असं म्हणत आंबेडकर यांनी काँग्रेसलादेखील लक्ष्य केलं. संघ आणि काँग्रसचे विचार जुळतात, अशा शब्दांमध्ये आंबेडकर यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. त्यामुळे भारिप बहुजन महासंघ महाआघाडीत सहभागी होण्याची शक्यता धूसर झाली आहे. भारिप बहुजन महासंघाला महाआघाडीत घेण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. धर्मनिरपेक्ष मतांसाठी भारिपनं महाआघाडीत यावं, असं काँग्रेस नेत्यांनी अनेकदा म्हटलं आहे. काल झालेल्या काँग्रेसच्या बैठकीतदेखील भारिपला महाआघाडीत घेण्याबद्दल चर्चा झाली. त्यांना 4 जागा देण्याची तयारीदेखील काँग्रेसनं दर्शवली. मात्र आता आंबेडकर यांनी संघ आणि काँग्रेसचे विचार जुळत असल्याचं म्हटल्यानं महाआघाडीला धक्का बसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भारिपनं असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमशी हातमिळवणी करत वंचित बहुजन विकास आघाडी स्थापन केली आहे. राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. यातील 8 जागा मित्रपक्षांना देण्याची तयारी काँग्रेस, राष्ट्रवादीनं दर्शवली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, सीपीएम आणि भारिपला 8 जागा देण्याचा निर्णय काँग्रेस, राष्ट्रवादीनं घेतला आहे. मात्र वंचित बहुजन विकास आघाडीला 12 जागा हव्या आहेत. भारिपनं आघाडीत यावं. मात्र एमआयएमला आघाडीत स्थान नसेल, अशी अट काँग्रेसनं घातली आहे. यावरुन आंबेडकरांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. 'भाजपाच्या कट्टर हिंदुत्वाविरोधात काँग्रेसनं मवाळ हिंदुत्वाचा मार्ग धरला आहे. मवाळ हिंदुत्व आणि मनुवाद यावर काँग्रेस आणि संघाचे विचार जुळतात,' अशी टीका आंबेडकरांनी केली.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपाcongressकाँग्रेसBharip Bahujan Mahasanghभारिप बहुजन महासंघAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन